या गावात बसतात चक्क दोन राज्यांचे सरपंच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 09:19 AM2018-04-09T09:19:34+5:302018-04-09T09:20:08+5:30
गावच्या राजकारणातील वर्चस्वावरून होणारे वादविवाद, हाणामाऱ्या याबाबत तुम्ही ऐकलेच असेल. पण असाही एक गाव आहे ज्या गावातील राजकारणावरून आणि गावच्या मालकीवरून चक्क दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहे.
भुवनेश्वर - गावच्या राजकारणातील वर्चस्वावरून होणारे वादविवाद, हाणामाऱ्या याबाबत तुम्ही ऐकलेच असेल. पण असाही एक गाव आहे ज्या गावातील राजकारणावरून आणि गावच्या मालकीवरून चक्क दोन राज्यांमध्ये वाद सुरू आहे. गेल्या 62 वर्षांपासून सुरू असलेल्या वादामुळे या गावात चक्क दोन राज्यांचे सरपंच बसतात. हा गाव ओदिशा आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर आहे. ओदिशातील कोरापूट जिल्ह्यात येणाऱ्या या गावाचे नाव कोटिया असे आहे.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान हे आज या गावाचा दौरा करणार आहे. तसेच ओदिशा सरकार आपल्या अधिकाऱ्यांचे एक पथक कोरापूट जिल्ह्यातील या गावात पाठवून आंध्र प्रदेशकडून करण्यात आलेल्या तथाकथित घुसखोरीचा तपास करणार आहेत. कोटिया ग्रामपंचायतीमध्ये एकूण 28 गाव असून त्यापैकी 21 गाव 1956 पासून ओदिशा आणि आंध्र प्रदेशमधील वादाचे केंद्र बनलेले आहे.
या गावातील दाहूर खारा नावाच्या ग्रामस्थाने सांगितले की, हा विवादित भाग आहे. आम्ही ओदिशा आणि आंध्र प्रदेश दोन्ही ठिकाणी मतदान करतो. आमच्या गावात दोन सरपंच आहेत. ज्यामध्ये ओदिशाकडून विश्वनाथ खिला आणि आंध्र प्रदेशकडून बिसू जेमेल सरपंच आहेत.
#Odisha govt to send a team of officials to Kotia village of Koraput to 'take stock of intrusion activities by #AndhraPradesh govt'. Union Min D Pradhan will also visit the area today. Kotia gram panchayat has 28 villages of which 21 are on disputed zone b/w Odisha&AP since 1956. pic.twitter.com/7X83KsoAS9
— ANI (@ANI) April 8, 2018
तर कोरापूर जिल्ह्याचे माजी डी. एम. जी.परिदा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, येथे अशा प्रकारचा कुठलाही वाद नाही आहे. हा भाग 1945 पासून ओदिशाच्या नकाशावर आहे. ओदिशाकडून येथे कुठल्याही प्रकारचे विकासकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे आंध्र सकराक येथील ग्रामस्थानं मोफत योजनांचे प्रलोभन देऊन आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ओदिशामधील सरकार पहिल्यांदाच विकासाचा विचार करत आहे.