दारूबंदीसाठी सार्वमत कुर्‍हा काकोडा : निकाल राखीव, महिलांमध्ये आनंद

By Admin | Published: November 29, 2015 11:57 PM2015-11-29T23:57:05+5:302015-11-29T23:57:05+5:30

कुर्‍हाकाकोडा,ता.मुक्ताईनगर : गावात दारुबंदी करण्यासाठी सार्वमतात रविवारी प्रशासनातर्फे येथे मतदान घेण्यात आले. त्यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने प्रशासनाने सार्वमताचा निकाल जाहीर केलेला नाही.

Sarpancham Sarvajanat Kharha Kakoda: Result of Result, Anand in Women | दारूबंदीसाठी सार्वमत कुर्‍हा काकोडा : निकाल राखीव, महिलांमध्ये आनंद

दारूबंदीसाठी सार्वमत कुर्‍हा काकोडा : निकाल राखीव, महिलांमध्ये आनंद

googlenewsNext
र्‍हाकाकोडा,ता.मुक्ताईनगर : गावात दारुबंदी करण्यासाठी सार्वमतात रविवारी प्रशासनातर्फे येथे मतदान घेण्यात आले. त्यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने प्रशासनाने सार्वमताचा निकाल जाहीर केलेला नाही.
कुर्‍हा काकोडा ग्रामसभेत वर्षभरापूर्वीच महिलांनी दारुबंदीचा ठराव ़केला होता. मात्र त्या विरोधात दारु दुकानदार न्यायालयात गेला होता. त्यानंतर खंडपीठाच्या आदेशान्वये मुक्ताईनगरच्या तहसीलदारांनी २९ रोजी दारुबंदीसंदर्भात सार्वमत घेतले. त्यात सकाळी आठ ते दुपारी दोनपर्यंत मतदान झाले. त्यात एकूण दोन हजार ८१८ मतांपैकी एक हजार ६३८ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.


प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे निकाल जाहीर केलेला नाही. अहवाल उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे पाठविण्यात येईल. त्यानुसार पुढील कारवाई होईल.
- जितेंद्र कुंवर,
तहसीलदार, मुक्ताईनगर

जळगाव जिल्हा दारुमुक्त करणे हा उद्देश नाही तर जोपर्यंत राज्य दारुमुक्त होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. , आता याबाबत राजकीय लोकांनी सकारात्मक होणे आवश्यक आहे. .
- संगीता पवार,
अध्यक्षा, दारुबंदी नशामुक्ती
आंदोलन महाराष्ट्र

Web Title: Sarpancham Sarvajanat Kharha Kakoda: Result of Result, Anand in Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.