सरसंघचालक मोहन भागवत चार दिवस जळगावी मुक्कामी अ.भा.कार्यकारी मंडळाची चिंतन बैठक: देशभरातील ३३ प्रतिनिधी येणार
By admin | Published: January 5, 2016 12:29 AM2016-01-05T00:29:39+5:302016-01-05T00:29:39+5:30
सेंट्रल डेस्क/ धुळे, नंदुरबारसाठी (आम्ही मुख्य २ वर घेत आहोत)
Next
स ंट्रल डेस्क/ धुळे, नंदुरबारसाठी (आम्ही मुख्य २ वर घेत आहोत)जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची चिंतन बैठक ५ ते ८ जानेवारी दरम्यान जळगावी होत असून त्यासाठी सरसंघचालक मोहन भागवत व सरकार्यवाह भैयाजी जोशी हे येत आहेत. चार दिवस ते जळगावात मुक्कामी असतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी सप्टेंबर आणि जानेवारी या कालावधित कार्यकारी मंडळाची चिंतन बैठक होत असते. यावर्षी ही बैठक ५ ते ८ जानेवारी दरम्यान शहरानजीक असलेल्या कुसुंबा येथील अहिंसातीर्थ गोशाळेत होणार आहे. पूर्व तयारीला वेगचिंतन बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ातील रा.स्व. संघ स्वयंसेवकांकडून बैठकीच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. सोमवारी अहिंसातीर्थ येथे विविध समित्यांची बैठक घेण्यात आली. ------कमालीची गुप्तताया बैठकीत देशभरातील पूर्णवेळ प्रचारक असणारे ३३ प्रतिनिधी सहभागी असतील. तसेच सरकार्यवाह भैयाजी जोशी हेदेखील उपस्थित असतील. या चिंतन बैठकीत कोणकोणत्या विषयांवर सत्र असतील. अन्य कोण मार्गदर्शन करतील याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहेत. ----चार दिवस मुक्कामसरसंघचालक मोहन भागवत हे ५ रोजी सकाळी जळगावात दाखल होती. चारही दिवस ते या चिंतन बैठकीत उपस्थिती देतील. ------हिंदू चेतना महासंगम१० जानेवारी रोजी रा.स्व. संघातर्फे जळगाव शहराचे हिंदू चेतना महासंगम शहरातील आय.एम.आर.कॉलेज मैदानावर होणार आहे. दुपारी ४ ते सायंकाळी ७ या कालावधित हा कार्यक्रम होईल. प्रमुख वक्ते म्हणून रा.स्व.संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार (दिल्ली) हे उपस्थित असतील. इंद्रेशकुमार यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन शहर कार्यवाह हितेश पवार यांनी केले आहे.