सरसंघचालक मोहन भागवतांच्या ताफ्यातील गाड्यांची धडक, थोडक्यात बचावले मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 09:26 AM2017-10-06T09:26:10+5:302017-10-06T09:51:38+5:30

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाड्यांची धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, यामध्ये सरसंघचालकांना कोणतीही इजा झालेली नसून ते सुखरुप आहेत.

Sarsanghchalak Mohan Bhagwati ki Kahan is not hurt, but there is no harm to the Sarsanghchalak | सरसंघचालक मोहन भागवतांच्या ताफ्यातील गाड्यांची धडक, थोडक्यात बचावले मोहन भागवत

सरसंघचालक मोहन भागवतांच्या ताफ्यातील गाड्यांची धडक, थोडक्यात बचावले मोहन भागवत

googlenewsNext

लखनौ - आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी एका अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाड्यांची धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. यमुना एक्स्प्रेस वेवरुन त्यांचा ताफा जात असताना हा अपघात घडला.  यावेळी मोहन भागवत मथुराच्या दिशेनं प्रवास करत होते. सुदैवानं या अपघातात मोहन भागवत यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. ते पूर्णतः सुरक्षित आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मथुराच्या सुरीर परिसरात मोहन भागवत यांच्या ताफ्यातील एका गाडीचा टायर फुटल्यानं हा अपघात झाला. यानंतर मागून येणा-या गाडीची धडक त्यावर बसली. या अपघातात सरसंघचालक थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान, अपघातानंतर दुस-या गाडीतून मोहन भागवत पुढील प्रवासासाठी रवाना झाले. मथुरा येथे त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे. 



Web Title: Sarsanghchalak Mohan Bhagwati ki Kahan is not hurt, but there is no harm to the Sarsanghchalak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.