सारसोळे डेपोतील नियंत्रण कक्षात घुसखोरी प्रशासनाचे दुर्लक्ष : भिकार्‍यांनी घेतला आश्रय

By admin | Published: July 20, 2015 12:35 AM2015-07-20T00:35:01+5:302015-07-20T00:35:01+5:30

नवी मुंबई : एनएमएमटीच्या सारसोळे डेपोतील नियंत्रण कक्षाचा वापर केला जात नसल्यामुळे बंद असलेल्या इमारतीच्या दरवाजाचे कुलुप तोडून भिकार्‍यांनी या इमारतीत पथारी पसरली आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.

In Sarsole depot control room ignore intruding administration: the beggars took shelter | सारसोळे डेपोतील नियंत्रण कक्षात घुसखोरी प्रशासनाचे दुर्लक्ष : भिकार्‍यांनी घेतला आश्रय

सारसोळे डेपोतील नियंत्रण कक्षात घुसखोरी प्रशासनाचे दुर्लक्ष : भिकार्‍यांनी घेतला आश्रय

Next
ी मुंबई : एनएमएमटीच्या सारसोळे डेपोतील नियंत्रण कक्षाचा वापर केला जात नसल्यामुळे बंद असलेल्या इमारतीच्या दरवाजाचे कुलुप तोडून भिकार्‍यांनी या इमारतीत पथारी पसरली आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे (एनएमएमटी ) स्वत:च्या मालमत्तांकडे दुर्लक्ष होत आहे. एनएमएमटीच्य विविध डेपोंमधील नियंत्रण कक्षांचा योग्य वापर होत नाही. कोपरखैरणेमधील कँटीनला अनेक वर्षांपासून मोफत वीज पुरविली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशीच स्थिती सारसोळे डेपोतील नियंत्रण कक्षाचीही आहे. या वास्तूचा काहीही उपयोग केला जात नाही. काही महिन्यांपासून भिकार्‍यांनी कुलुप तोडून आतमध्ये राहण्यास सुरुवात केली आहे. धर्मशाळेप्रमाणे या जागेचा वापर सुरू आहे. एनएमएमटी प्रशासनाचे या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष होत आहे. एनएमएमटीने येथील भिकार्‍यांना हलवावे. या वास्तूचा वापर करावा किंवा ती भाड्याने द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
फोटो
१९सारसोळे, नावाने आहे

Web Title: In Sarsole depot control room ignore intruding administration: the beggars took shelter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.