शशिकला यांचे बंगळुरू कोर्टात आत्मसमर्पण
By admin | Published: February 15, 2017 10:42 PM2017-02-15T22:42:01+5:302017-02-15T22:42:01+5:30
बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर शशिकला नटराजन यांनी आज संध्याकाळी बंगळुरूमधील न्यायालयात
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर शशिकला नटराजन यांनी आज संध्याकाळी बंगळुरूमधील न्यायालयात आत्मसमर्पण केले. वैद्यकीय चाचणी केल्यानंतर शशिकलांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
न्यायालयात आत्मसमर्पण करण्यापूर्वी शशिकला यांनी दिवंगत जयललिता यांच्या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्या आत्मसमर्पण करण्यासाठी बंगळुरूला रवाना झाल्या. त्यांनी आत्मसमर्पणासाठी काही दिवसांचा अवधी देण्याची मागणी केली होती. पण कोर्टाने ती फेटाळून लावली होती. आता शशिकला यांना परप्पाना अग्रहारा कारागृहात ठेवण्यात येईल.