शशिकलाचे रडणे म्हणजे मगरीचे अश्रू - पनीरसेल्वम
By Admin | Published: February 13, 2017 10:45 AM2017-02-13T10:45:16+5:302017-02-13T10:46:59+5:30
शशिकलाचे रडणे म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. शशिकला सांगत असेल सर्व आमदार त्यांना हवे तिथे जायला मुक्त आहेत.
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 13 - शशिकलाचे रडणे म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. शशिकला सांगत असेल सर्व आमदार त्यांना हवे तिथे जायला मुक्त आहेत तर, त्यांना त्यांच्या मतदरासंघात परत पाठव असे तामिळनाडूचे काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी म्हटले आहे. शशिकला यांची पत्रकारपरिषद झाल्यानंतर लगेचच पनीरसेल्वम यांनी पत्रकारपरिषद घेतली.
महाबलीपूरमच्या गोल्डन बे रिसॉर्टमधील काही आमदार माझ्या संपर्कात आहेत. एका आमदारावर चार गुंड लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी आमदारांना घेरले असून त्यांचा छळ सुरु आहे असा दावा पनीरसेल्वम यांनी केला.
तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात या नात्याने अधिकारांचा वापर करुन थेट रिसॉर्टमध्ये जाऊन कारवाई का करत नाही ? या प्रश्नावर त्यांनी परिस्थिती नाजूक आहे. असे पाऊल उचलले तर अजून अडचणी निर्माण होतील त्यामुळे मी संयम ठेऊन आहे असे पनीरसेल्वम म्हणाले.