जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांविरुद्ध हक्कभंग दाखल करणार सतीश पाटील : शासकीय कार्यक्रमात कमळाचा वापर का?

By admin | Published: October 18, 2016 12:38 AM2016-10-18T00:38:47+5:302016-10-18T00:38:47+5:30

जळगाव : जामनेर येथे झालेल्या मुख्यमंत्री समाधान शिबिराच्या शासकीय कार्यक्रमात भाजपाचे पक्षचिन्ह असलेल्या कमळाच्या फुलातून ज्योत प्रज्ज्वालित करीत उद्घाटन करीत पक्षाचा प्रचार केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह शासकीय अधिकार्‍यांविरोधात हिवाळी अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Satish Patil to file claim against District Magistrate, Superintendent of Police: Use of lotus in government program? | जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांविरुद्ध हक्कभंग दाखल करणार सतीश पाटील : शासकीय कार्यक्रमात कमळाचा वापर का?

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांविरुद्ध हक्कभंग दाखल करणार सतीश पाटील : शासकीय कार्यक्रमात कमळाचा वापर का?

Next
गाव : जामनेर येथे झालेल्या मुख्यमंत्री समाधान शिबिराच्या शासकीय कार्यक्रमात भाजपाचे पक्षचिन्ह असलेल्या कमळाच्या फुलातून ज्योत प्रज्ज्वालित करीत उद्घाटन करीत पक्षाचा प्रचार केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह शासकीय अधिकार्‍यांविरोधात हिवाळी अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सोमवारी दुपारी झालेल्या या पत्रकार परिषदेला महानगराध्यक्ष परेश कोल्हे, कार्याध्यक्ष विलास पाटील, ॲड.सचिन पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रिका प्रशासनाने नाही भाजपाने केली
जामनेर येथील कार्यक्रमात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना डावलण्यासाठी शासकीय प्रोटोकॉलनुसार पत्रिका छापल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. मात्र ही पत्रिका प्रशासनाने नाही तर भाजपाने तयार केली आहे. भाजपाला संरक्षण देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा शासकीय कार्यक्रम असल्याचे जाहीर केले.
शासकीय कार्यक्रमात कमळाचा वापर का?
मुख्यमंत्री समाधान शिबिर हा शासकीय कार्यक्रम होता तर त्यात भाजपाचे पक्षचिन्ह असलेल्या कमळाच्या फुलाचा वापर का केला. मुख्यमंत्री दीपप्रज्ज्वालन करीत असताना व्यासपीठावर विभागीय आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी हे टाळ्या वाजवित आहेत. या प्रकरणी हिवाळी अधिवशेनात हक्कभंग दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौर्‍यावर आले. मात्र जलसंपदा मंत्र्यांना खुश करण्याव्यतिरिक्त त्यांनी काही केले नाही. पालकमंत्र्यांनी शेतमालाला भाव जाहीर करण्याची विनंती केली. मात्र त्याबाबत काही घोषणा केली नाही. त्यामुळे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी स्थिती असल्याने शेतकर्‍यांचा भ्रमनिरास झाला आहे.
वाघ असलेले गुलाबराव चिडीमारणारे कसे झाले
सहकार मंत्री गुलाबराव पाटील हे शेतकर्‍यांची बाजू मांडतील म्हणून तेथील नागरिकांनी त्यांना बोलण्यासाठी आग्रह केला. मात्र आपल्याकडे चिडी मारण्याची बंदूक देत वाघ मारण्याची अपेक्षा कशी करता असे सांगत त्यांनी शेतकर्‍यांचा भ्रमनिरास केला. वाघ असणारे गुलाबराव चिडीमारणारे कसे झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Satish Patil to file claim against District Magistrate, Superintendent of Police: Use of lotus in government program?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.