सातपूरचे पोलीस निरीक्षक देवीकर यांचे निलंबन

By admin | Published: January 5, 2015 11:10 PM2015-01-05T23:10:32+5:302015-01-06T00:04:26+5:30

नाशिक : सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जमीन फसवणुकीच्या गुन्‘ातील तपासात त्रुटी आढळून आल्याने तपास अधिकारी आणि सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांच्यावर पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी कर्तव्यात कसूर आणि कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर वर्षाच्या प्रारंभीच कारवाईचा बडगा उगारून इतर अधिकार्‍यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे़ सातपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या देवीकरांविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रारी वाढल्या होत्या़ त्यातच पंधरा दिवसांपूर्वी जमीन फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणाचा देवीकर तपास करीत होते़ यामध्ये एका संशयिताला अटकही करण्यात आली होती़ देवीकर यांनी केलेल्या तपासात वरिष्ठ अधिकार्‍यांना अनेक त्रुटी आढळून आल्या. तसेच यातील संशयिताला अटक क

Satpur Police Inspector Devikar's Suspension | सातपूरचे पोलीस निरीक्षक देवीकर यांचे निलंबन

सातपूरचे पोलीस निरीक्षक देवीकर यांचे निलंबन

Next

नाशिक : सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जमीन फसवणुकीच्या गुन्‘ातील तपासात त्रुटी आढळून आल्याने तपास अधिकारी आणि सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश देवीकर यांच्यावर पोलीस आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी कर्तव्यात कसूर आणि कामात हलगर्जीपणा करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर वर्षाच्या प्रारंभीच कारवाईचा बडगा उगारून इतर अधिकार्‍यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे़ सातपूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या देवीकरांविरोधात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रारी वाढल्या होत्या़ त्यातच पंधरा दिवसांपूर्वी जमीन फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणाचा देवीकर तपास करीत होते़ यामध्ये एका संशयिताला अटकही करण्यात आली होती़ देवीकर यांनी केलेल्या तपासात वरिष्ठ अधिकार्‍यांना अनेक त्रुटी आढळून आल्या. तसेच यातील संशयिताला अटक करण्याच्या कारणांचे स्पष्टीकरणही देवीकर यांना देता आले नसल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे़ त्यामुळे देवीकर यांची पाच दिवसांपूर्वी नियंत्रण कक्षामध्ये बदलीही करण्यात आली होती; मात्र आता निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Satpur Police Inspector Devikar's Suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.