सत्यमेव जयते! विजयानंतर अहमद पटेल यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2017 02:22 AM2017-08-09T02:22:35+5:302017-08-09T02:27:45+5:30
अत्यंत आव्हानात्मक ठरलेल्या निवडणुकीत भाजपाध्यक्ष अमित शहांची रणनीती आणि भाजपाचे सर्व प्रयत्न हाणून पाडत विजय मिळवल्यानंतर अहमद पटेल यांनी "सत्यमेव जयते" अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अहमदाबाद. दि. 9 - अत्यंत आव्हानात्मक ठरलेल्या निवडणुकीत भाजपाध्यक्ष अमित शहांची रणनीती आणि भाजपाचे सर्व प्रयत्न हाणून पाडत विजय मिळवल्यानंतर अहमद पटेल यांनी सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली आहे. काल राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान झाल्यानंतर राजकीय नाट्य रंगले होते. मात्र अनेक वळणे घेतल्यानंतर आज मध्य रात्री पावणे दोन वाजता निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात अहमद पटेल यांनी 44 मते मिळवत अर्ध्या मताने विजय मिळवला.
या विजयानंतर अहमद पटेल यांनी ट्विटरवरून सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली. "ही निवडणूक माझ्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात अवघड निवडणूक होती. बऱ्याच निवडणुका लढवल्या मात्र एवढे आव्हान कधी मिळाले नव्हते. भाजपाकडून मला पराभूत करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारने मला पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती. त्यांचा यामागे काय हेतू होता हे माहीत नाही." असे अहमद पटेल म्हणाले.
{{{{twitter_post_id####
Satyamev Jayate. Not just my victory. Its defeat of most blatant use of money power,muscle power&abuse of state machinery,tweets Ahmed Patel
— ANI (@ANI) August 8, 2017
"आज मी मिळवलेला विजय हा केवळ वैयक्तिक माझा विजय नाही. तर तो सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांचा विजय आहे. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांचा हा पराभव आहे," असेही अहमद पटेल यांनी सांगितले.
}}}}गांधी की धरती गुजरात में सत्य की जीत हुई।
— Randeep S Surjewala (@rssurjewala) August 8, 2017
भारत छोड़ो आंदोलन की 75वीं वर्षगाँठ पर सबसे बेहतरीन तोहफ़ा।
अहंकार हारा,सच्चाई जीती।
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भारत छोडो आंदोलनाच्या 75व्या वर्धापन दिनी मिळालेली ही सर्वोत्तम भेट आहे. गांधीजींच्या गुजरातमध्ये सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काँग्रेस पक्षाकडूनही या विजयाबद्दल अहमद पटेल यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.