केजरींच्या साडवासाठी सत्येंद्र जैन यांनी केला जमिनीचा सौदा
By admin | Published: May 8, 2017 07:39 PM2017-05-08T19:39:45+5:302017-05-08T19:55:32+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात जोरदार मोर्चा उघडणाऱ्या कपिल मिश्रा यांनी आज पुन्हा एकदा केजरीवाल
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात जोरदार मोर्चा उघडणाऱ्या कपिल मिश्रा यांनी आज पुन्हा एकदा केजरीवाल यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत. सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांच्या साडवासाठी 50 कोटी रुपयांच्या जमिनीचा व्यवहार केला होता. असा आरोप मिश्रा यांनी केला. तसेच सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांना दोन कोटी रुपये दिल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करत उद्या सकाळी 11.30 वाजता सीबीआयकडे यासंदर्भातील पुरावे आपण सोपवणार असून, त्याबाबत तक्रार नोंदवणार असल्याचे कपिल मिश्रा यांनी सांगितले.
मिश्रा यांनी आज केजरीवाल यांच्यावरील आरोपांची मालिका नव्याने सुरु केली. आपने पंजाब विधानसभा आणि दिल्लीतील पालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि सौदेबादी केल्याचा आरोप त्यांनी केला.
कपिल मिश्रा पुढे म्हणाले. "आपचे नेते संजय सिंह यांनी या व्यवहाराशी संबंधित माणसाचे नाव विचारले होते. ही व्यक्ती केजरीवाल यांचा साडू आहे. सत्येंद्र जैन यांनी बंसल कुटुंबासाठी हा व्यवहार केला होता." काहीही झाले तरी मी आप सोडणार नाही. मी भाजपाचा एजंट असल्याचे आरोप होत आहेत. पण भाजप, काँग्रेस आणि मोदी यांच्या भ्रष्टाराचाविरोधात मी भक्कमपणे लढा दिला आहे. जर मी भाजपाचा एजंट असेन तर संजय सिंह आणि केजरीवाल यांनी तसे पुरावे द्यावेत, तसेच माझ्यावर भ्रष्टाचाराचेही कुठले आरोप नाही आहे, असे आव्हानही मिश्रा यांनी दिले.
दरम्यान, कपिल मिश्रा यांनी आज दिल्लीतल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागा(ACB)ला केजरीवालांच्या 400 कोटींच्या टँकर घोटाळ्याचे पुरावे सुपूर्द केले. तसेच माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीला केजरीवाल जाणूनबुजून उशीर करत असल्याचा आरोपही मिश्रा यांनी केला आहे.
एसीबीकडे पुरावे दिल्यानंतर त्यांनी केजरीवाल कशा प्रकारे चौकशीसाठी टाळाटाळ करत आहेत, हेही अधिका-यांना सांगितलं आहे. मिश्रा यांनी दावा केला आहे की, मंत्री नसतानाही याची चौकशी करून त्याचा अहवाल केजरीवालांना सुपूर्द केला होता. त्यावेळी मी टँकर घोटाळ्यात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची शिफारस केली होती. मिश्रा म्हणाले, केजरीवाल आणि त्यांच्या दोन सहका-यांशी संबंधितही टँकर घोटाळ्यातसंदर्भात पुरावे दिले आहेत. या पुराव्यांवरून शीला दीक्षित यांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
Tomorrow I have got an appointment with CBI at 11.30 am, will officially lodge FIR and be present as a witness:Kapil Mishra pic.twitter.com/Zso110RHme
— ANI (@ANI_news) May 8, 2017