सौदी अरबच्या राजदूताचा नेपाळी महिलांवर बलात्कार
By Admin | Published: September 9, 2015 11:58 AM2015-09-09T11:58:58+5:302015-09-09T13:37:38+5:30
सौदी अरबच्या राजदूताने व त्याच्या मित्रांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप दोन नेपाळी महिलांनी केला आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - सौदी अरबच्या राजदूताने व त्याच्या मित्रांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप दोन नेपाळी महिलांनी केला आहे. तसेच त्याची पत्नी व मुलीने आपल्याला डांबून ठेवून शारिरिक छळ केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी गुडगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौदी दूतावासाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
गुडगावमधील एका इमारतीतील पाचव्या मजल्यावर दोन नेपाळी महिलांचा छळ होत असल्याची माहिती मैती इंडिया या एनजीओला मिळाली असता त्यांनी या प्रकरणाची माहिती गुडगाव पोलिसांना देऊन सोमवारी रात्री त्या दोन्ही महिलांची सुटका केली.
नेपाळमधील भूकंपानंतर आम्हाला भारतात आणण्यात आले, चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आश्वासनही आम्हाला मिळाले होते. अनेक महिन्यांपासून आम्ही त्याच्या घरी काम होतो, मात्र आम्हालला पगारातील १ रुपयाही देण्यात आला नाही. तो माणूस सतत आमचा छळ करत असे आणि चाकूचा धाक दाखवून आमच्यावर बलात्कार करत असे. कित्येक वेळेस त्याचे मित्र घरी येत व तेही आमच्यावर अत्याचार करत, अशी माहिती पीडित महिलांनी दिली आहे. तसेच त्या राजदूताची पत्नी व मुलीनेही आम्हाला डांबून ठेवत, आमचा शारीरिक छळ केला, कित्येक दिवस उपाशीही ठेवले, असेही त्या महिलांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी राजदूतीच पत्नी व तिच्या मुलीवर छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या दोन्ही महिलांना नेपाळी दूतावासाच्या मदतीने पुन्हा नेपाळला पाठवण्यात येईल, असे अधिका-यांनी सांगितले.