कर्नाटकातील सौंदतीच्या देवस्थान १५ ते २० डिसेंबर राहणार बंद; मंदीर प्रशासनाकडून स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 06:19 PM2021-12-12T18:19:27+5:302021-12-12T18:20:28+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात गर्दी होऊ नये व कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

The Saundati temple in Karnataka will be closed from December 15 to 20 | कर्नाटकातील सौंदतीच्या देवस्थान १५ ते २० डिसेंबर राहणार बंद; मंदीर प्रशासनाकडून स्पष्ट

कर्नाटकातील सौंदतीच्या देवस्थान १५ ते २० डिसेंबर राहणार बंद; मंदीर प्रशासनाकडून स्पष्ट

googlenewsNext

- रवींद्र येसादे  

कर्नाटकातील सौंदत्ती येथील यल्लामा मंदिर भाविकांसाठी पाच दिवस बंद करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. भाविकांना पाच दिवस मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. १९ डिसेंबर व २० डिसेंबर रोजी होणाऱ्या पौर्णिमेनिमित्त देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल होतात. देवीची ही महत्वाची पौर्णिमा असल्याने येथे नेहमीच गर्दी होते. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात गर्दी होऊ नये व कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. १५ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत मंदिर सर्व भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदिर परिसरातील सर्व बाजुने पोलिस प्रशासनाकडून नाकेबंदी करण्यात येणार आहे. दुकाने बंद राहणार आहे. तरी भाविकांनी पाच दिवसात येऊ नये, असं मंदीर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 

कोग नोळी,संकेश्वर, येरगट्टी आदी ठिकाणी वाहनांची तपासणी करूनच वाहनांना इतर प्रवासासाठी सोडण्यात येणार आहे. तरी कोल्हापूर, सांगली , बेळगाव  जिल्ह्यातील भाविकाने ची नोंद घ्यावी असेही मंदीर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या अठवड्यापासून  भाविक देवीच्या दर्शनासाठी ये- जा करीत आहे . केवळ मंदिरात मास्कचा वापर भाविक करीत असले तरी सोशल डिस्टन्शनचा अभाव आहे. यासाठी मंदिर प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. मंदिर परिसरात मास्कचा वापर भाविकांकडून केला जात नाही, ही गंभीर बाब असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: The Saundati temple in Karnataka will be closed from December 15 to 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.