Saurabh Bharadwaj : "पंजाब आणि दिल्लीत AAP फोडण्याचा प्रयत्न"; सौरभ भारद्वाज यांचा भाजपावर मोठा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 02:08 PM2024-03-28T14:08:07+5:302024-03-28T14:25:54+5:30
AAP Saurabh Bharadwaj And BJP : दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.
दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आपल्या जाळ्यात अडकवायचं आहे. याशिवाय भाजपाला पंजाब-दिल्लीमध्येही आम आदमी पार्टी (AAP) फोडायची आहे. भाजपाला माहीत आहे की, पंजाब आणि दिल्लीत 'आप'ला पराभूत करता येणार नाही. त्यामुळेच आपचे खासदार आणि आमदार यांना फोडून नेलं जात आहे असा दावाही सौरभ भारद्वाज यांनी केला आहे.
"30 ऑक्टोबर 2023 रोजी अरविंद केजरीवाल यांना पहिलं समन्स आल्यापासून केजरीवाल काही गोष्टी बोलत आहेत. ते म्हणाले होते की, ईडीचा उद्देश हा त्यांना खोट्या खटल्यात अडकवून जेलमध्ये पाठवणे आणि नंतर दिल्ली आणि पंजाबमधील 'आप'च्या आमदारांना भाजपामध्ये आणणे आणि सरकार, पक्ष फोडणं, हा आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणूक लढवून भाजपा 'आप'ला पराभूत करू शकत नाही" असंही सौरभ यांनी म्हटलं आहे.
#WATCH दिल्ली के मंत्री और AAP नेता सौरभ भारद्वाज ने कहा, "अगर भाजपा पंजाब में इतनी बुरी स्थिति में है, तो उन्होंने कल हमारे सांसद(सुशील कुमार रिंकू) और विधायक (शीतल अंगुराल) को क्यों खरीदा? पंजाब के हमारे विधायकों ने कल हमें बताया कि राज्य में कई विधायकों को पाला बदलने और भाजपा… pic.twitter.com/O9tKQwATTw
— ANI_HindiNews (@AHindinews) March 28, 2024
पंजाबमधील आम आदमी पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेस-अकाली दल दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबमध्ये भाजपाची अवस्था एवढी वाईट असताना ‘आप’चे खासदार, आमदार का फोडत आहेत?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंजाबमधील अनेक आमदारांना भाजपामध्ये सामील होण्यासाठी पैसे, पद आणि Y+ सुरक्षा देऊ करण्यात आली होती.
आमचे जालंधरचे खासदार रिंकू यांचा कार्यकाळ संपला आहे. आता त्यांना निवडणूक लढवायची होती. जालंधरमध्ये भाजपा चौथ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर येण्यासाठी एक खासदार भाजपामध्ये का जाईल? बुधवारी पंजाब आम आदमी पक्षाच्या तीन आमदारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, त्यांना फोनवरून भाजपामध्ये सामील होण्याचे आमिष दाखवण्यात आले. दिल्ली आणि पंजाबमध्ये आमचे सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालवले जात आहे. ज्या फोनवरून फोन आला होता तो नंबरही आमदारांनी जाहीर केला आहे असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे.