"वाचवा वाचवा..."! दोन पिटबुल कुत्र्यांचा डिलिव्हरी बॉयवर हल्ला, केल रक्तबंबाळ; VIDEO पाहून थरकाप उडेल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 07:01 PM2024-07-18T19:01:30+5:302024-07-18T19:02:35+5:30
काही लोक हौस म्हणून आणि घराच्या संरक्षणासाठी कुत्रे पाळतात. अनेक घरांमध्ये घातक कुत्रेही बघायला मिळतात. कधी कधी हे कुत्रे बाहेरील लोकांसाठी मोठी समस्याही बनतात...
काही लोक हौस म्हणून आणि घराच्या संरक्षणासाठी कुत्रे पाळतात. अनेक घरांमध्ये घातक कुत्रेही बघायला मिळतात. कधी कधी हे कुत्रे बाहेरील लोकांसाठी मोठी समस्याही बनतात. छत्तीसगडच्या रायपूरमधूनही असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
येथे दोन पिटबुल कुत्र्यांनी एका डिलिव्हरी बॉयवर हल्ला केला. या कुत्र्यांच्या हल्ल्यात डिलिव्हरी बॉय जखमी झाला आहे. त्याच्या हात-पायातून रक्तस्त्राव होत आहे. कुत्र्यांपासून वाचवण्यासाठी डिलिव्हरी बॉय लोकांकडे मदतीची मागणी करत होता. या भयानक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना एका शेजाऱ्याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या डिलिव्हरी बॉयचे नाव सलमान खान असे आहे. तो छत्तीसगडच्या रायपूरमधील अनुपम नगर कॉलनीत एका महिला डॉक्टरकडे काही सामान पोहोचवण्यासाठी गेला होता. मात्र, त्याने दरवाजा उघडताच दोन कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. ही घटना शुक्रवारी घडल्याचे समजते.
गंभीर जखमी -
व्हायरल व्हिडिओमध्ये दोन पिटबूल कुत्र्यांनी डिलिव्हरी बॉयवर हल्ला केल्याचे दिसत आहे. याशिवाय, आणखी एक तिसरा कुत्राही गेटवर उभा असल्याचे आहे. सलमान त्यांच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतो आणि एका कारवर चढतो. सलमानच्या हातपायातून रक्त येतानाही दिसत आहे. दरम्यान, व्हिडिओ शूट करणाऱ्या महिलेकडे पाहून सलमान 'मला वाचवा' असे म्हणतानाही दिसत आहे.
A delivery boy named Salman Khan was attacked by a Pitbull in Raipur.
— Incognito (@Incognito_qfs) July 16, 2024
I hope action will be taken against the owners in this case.
Govt of India has recently banned sale and breeding of Pitbull & 23 other dangerous dog breeds in India. pic.twitter.com/n2pK55jeYw
यानंतर, एक मुलगी डिलिव्हरी बॉयची मदत करण्यासाठी धावते. माध्यममांतील वृत्तांनुसार, नंतर, तेथील काही स्थानिक लोकांनी सलमानला रुग्णालयात दाखल केले.