माती वाचवा मोहीम : नैसर्गिक घटकांशिवाय मातीचा उपयोग नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 05:57 AM2022-06-08T05:57:05+5:302022-06-08T05:57:43+5:30
मातीबाबत सातत्याने संशोधन होत आलेले आहे आणि आम्हाला माहिती मिळत आलेली आहे. विज्ञान म्हणते की, नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन थोडे जास्त प्रमाणात असायला हवे.
- भाग २
आम्ही सर्वजण हे जाणतो की, मातीमध्ये केवळ नैसर्गिक घटकच मोठ्या प्रमाणात असायला हवेत असे नाही, तर काही घटक कमी प्रमाणातही असायला हवेत. त्यामुळे मातीची शक्ती कायम राहते. देशातील मोठ्या भागात मातीची शक्ती कमी होत आहे. माती वाचवा अभियानाच्या माध्यमातून सद्गुरू मातीची ही शक्ती वाचविण्याचे आवाहन करीत आहेत. लोकमत वृत्तपत्र समूह या अभियानाला बळ देण्याचे काम करीत आहे.
आपण कधी याकडे लक्ष दिले आहे की, एका शेतात कृषी उत्पन्न चांगले होते, तर शेजारच्या शेतात मात्र पीक तुलनेत तेवढे अधिक होत नाही. एकाच प्रकारचे बी आणि भौगोलिक परिस्थिती एकसारखी असूनही उत्पन्नात फरक पडतो. याचे कारण आहे मातीची शक्ती. शक्तीचा अर्थ आहे की, त्यात किती प्रमाणात कोणते नैसर्गिक घटक आहे. इ.स. १८४० पूर्वी असे समजले जात होते की, उत्पन्नासाठी मातीमध्ये अकार्बनिक पदार्थांची आवश्यकता असते. मात्र, हे माहीत नव्हते की, त्यातील घटकांचे प्रमाण किती असायला हवे.
मातीबाबत सातत्याने संशोधन होत आलेले आहे आणि आम्हाला माहिती मिळत आलेली आहे. विज्ञान म्हणते की, नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम, कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन थोडे जास्त प्रमाणात असायला हवे. कमी प्रमाणात का असेना पण लोह, गंधक, सिलिका, क्लोरिन, मॅगनीज, जस्त, निकेल, कोबाल्ट, मोलिब्डेनम, तांबे, बोरन व सॅलिनियमचे प्रमाणही खूप गरजेचे आहे. निसर्ग आपल्या पद्धतीने या घटकांचे प्रमाण निश्चित करतो. मात्र, मनुष्याने यात हस्तक्षेप केल्याने सर्व गणित बिघडले आहे.
विशेष म्हणजे मातीमध्ये नायट्रोजन कार्बनिक आणि अकार्बनिक स्वरूपातही असते. कार्बनिक पदार्थ सडल्याने अमोनिया बनतो. अमोनियासोबत जिवाणूंच्या क्रियेप्रतिक्रियेतून जिवाणूंपासून एंझाइमची निर्मिती होते. अन्य घटकांचीही आपापली भूमिका असते.
कॅल्शियम रोपाला मजबूत करते, तर फॉस्फेट फूल आणि फळांसाठी फायदेशीर असते. मॅग्निशियम क्लोरोफिल बनविण्याच्या प्रक्रियेत साहाय्य करते. हायड्रोजन आणि ऑक्सिजन मातीतील पाण्यातून रोपाला मिळतो. या घटकांच्या आधारेच हे ठरते की, माती कशी आहे? आपण ज्या पीएच व्हॅल्यूबाबत ऐकता ते अतिशय महत्त्वाचे आहे. अधिक आम्लता अथवा अधिक क्षार दोन्हीही रोपांसाठी हानिकारक आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर जर पीएच व्हॅल्यू १ ते ६ असेल, तर त्याचा अर्थ आहे की, माती आम्लीय आहे. पीएच व्हॅल्यू ७ ते ८.५ असेल, तर माती खारट असेल. पीएच व्हॅल्यू ८.५ ते १४ च्या दरम्यान असेल, तर माती क्षार असलेली आहे.
आपल्या मातीला ओळखणे आणि तिचे विश्लेषण करणे खूप गरजेचे आहे. आपण जर मातीला ओळखले नाही, तर ती आपल्यासाठी उपयोगी कशी ठरेल, मातीला नैसर्गिक वातावरण द्या, तर माती शक्तिशाली बनून राहील. ...