जखमीला वाचविण्यासाठी तरुणाने पगडी उतरवली

By Admin | Published: May 18, 2015 02:51 AM2015-05-18T02:51:57+5:302015-05-18T02:51:57+5:30

रस्त्यावर कार अपघातात जखमी झालेल्या ५ वर्षाच्या मुलाचा रक्तस्राव थांबविण्यासाठी २२ वर्षाच्या शीख युवकाने धार्मिक प्रतीक असणारी आपली पगडीही

To save the wounded, the youth started wearing a turban | जखमीला वाचविण्यासाठी तरुणाने पगडी उतरवली

जखमीला वाचविण्यासाठी तरुणाने पगडी उतरवली

googlenewsNext

मेलबर्न : रस्त्यावर कार अपघातात जखमी झालेल्या ५ वर्षाच्या मुलाचा रक्तस्राव थांबविण्यासाठी २२ वर्षाच्या शीख युवकाने धार्मिक प्रतीक असणारी आपली पगडीही उतरवल्याची घटना न्यूझीलंडमध्ये घडली असून, या युवकावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हरमनसिंग असे या युवकाचे नाव असून, अपघात झाला तेव्हा तो आपल्या घरी आॅकलंड येथे होता. पाच वर्षाचा मुलगा आपल्या
बहिणीबरोबर शाळेत जात असताना त्याला कारने धक्का दिला. अपघाताचा आवाज ऐकून हरमनसिंग धावत घटनास्थळी आला व त्याने पाहिले तेव्हा छोट्या मुलाच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. त्याने क्षणभरही विचार केला नाही. आपली पगडी उतरवली व त्या मुलाचे डोके बांधले.
या क्षणाचे छायाचित्र घटना पाहणाऱ्या गगन धिल्लाँन नावाच्या युवकाने काढले. न्यूझीलंड हेराल्डमध्ये ते प्रसिद्ध झाल्यानंतर हरमनसिंग एका रात्रीत हीरो बनला. फेसबुकवर त्याला शेकडो हिरोग्राम आले. अमेरिका, युरोप व भारतातून सदिच्छांचा वर्षाव होत असल्याने हरमन भारावला आहे. या मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याची प्रकृती सुधारत आहे.
गगन धिल्लाँन म्हणतो, शीख तरुणाने पगडी उतरवणे ही घटना दुर्मिळ आहे. अपघातग्रस्त लहान मुलाला वाचवण्यासाठी हरमनने हे पाऊल उचलले, मला त्याचा अभिमान वाटतो. हरमनसिंग भारतीय असून, आॅकलंडमध्ये शिक्षणासाठी राहत आहे. येथील एका बेकरीमध्ये तो काम करतो. (वृत्तसंस्था)
 

Web Title: To save the wounded, the youth started wearing a turban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.