सव्वा लाखाची रोकड ठेवलेली पेटी लांबवली वॉचमनच्या घरात चोरी : कर्ज फेडण्यासाठी विकली होती रिक्षा विक्री
By admin | Published: May 27, 2016 07:53 PM2016-05-27T19:53:30+5:302016-05-27T19:53:30+5:30
जळगाव: कर्ज फेडण्यासाठी रिक्षा विक्रीतून आलेले एक लाख २० हजार रुपये व चांदीचे दागिने असा एक लाख २३ हजार पाचशे रुपयांचा ऐवज ठेवलेली पेटीच श्रावण जोरसिंग जाधव (मूळ रा.ढेकू तांडा ता.अमळनेर) या वॉचमनच्या झोपडी वजा घरातून चोरट्यांनी लांबवल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Next
ज गाव: कर्ज फेडण्यासाठी रिक्षा विक्रीतून आलेले एक लाख २० हजार रुपये व चांदीचे दागिने असा एक लाख २३ हजार पाचशे रुपयांचा ऐवज ठेवलेली पेटीच श्रावण जोरसिंग जाधव (मूळ रा.ढेकू तांडा ता.अमळनेर) या वॉचमनच्या झोपडी वजा घरातून चोरट्यांनी लांबवल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रावण जाधव हे दिवसा रिक्षा चालवतात व रात्री बांधकामाच्या ठिकाणी वॉचमनचे काम करतात. सध्या ते पंचमुखी हनुमान मंदिराजवळ असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी पत्नी लताबाई, मुलगा नितीन, संदीप व सून मायाबाई असे एकत्र झोपडी वजा घर करून राहतात. जाधव यांच्याजवळ असलेली रिक्षा (क्र.एम.एच.१९ बी.जे.८५१६) सुभाष उत्तम चव्हाण (रा.धोबी वराड, ता.जळगाव) यांच्या नावावर असून तिचे बॅँकेचे हप्ते जाधव हेच भरतात. कर्ज झाल्यामुळे त्यांनी ही रिक्षा नातेवाईक असलेले ईश्वर बल्लु चव्हाण (रा.जिन्सी अबोडा ता.रावेर) यांना एक लाख २० हजार रुपयात विक्री केली होती. त्याचे एक लाख २० हजार रुपये रोख मिळाले होते.पत्नीच्या पेटीत ठेवली रोकडजाधव यांनी ही रक्कम पत्नी लताबाई यांच्याजवळ दिली होती. त्यांनी त्यांच्या पत्र्याच्या पेटीत ही रक्कम ठेवली होती त्यात पाच तोळे चांदीचे कडे व गाडीचे कागदपत्रे, नितीनचे लायसन्सही ठेवले होते. गुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर जाधव हे बांधकामाच्या ठिकाणी झोपायला गेले, मुले बाहेर पत्र्याच्या शेडमध्ये झोपले तर पत्नी लताबाई व सून मायाबाई या घरात झोपल्या. तेथे खाटेखाली ही पेटी ठेवली होती. सकाळी सहा वाजता बांधकामावर पाणी मारायचे असल्याने लताबाई या उठल्या असता खाटेखालची पेटीच गायब झालेली होती.इन्फो...ढसाढसा रडल्या लताबाई...रात्रंदिवस राब राब राबतो, तरी कर्ज फिटत नाही. पोटभर जेवायला मिळत नाही. कर्जाच्या कटकटीतून मुक्त होण्यासाठी रिक्षा विकली व तीच रक्कम चोरी झाल्याने आता काय करू..अशा शब्दात लताबाई या ढसाढसा रडत पोलीस स्टेशनला गेल्या. तेथे ही आपबिती ऐकून पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनाही धक्का बसला. त्यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्यांना परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढण्यासाठी बाहेर रवाना केले.(सुधारीत)