म्हणे, ‘त्या’ कुटुंबांत विवाह करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:37 AM2018-01-05T01:37:59+5:302018-01-05T01:38:15+5:30
बँकेत नोकरी करून हरामाचा (अनैतिक) पैसा कमावणाºया कुटुंबांना टाळून लग्न जुळवताना धार्मिक वृत्तीच्या कुटुंबांचा विचार करा, असा फतवा इस्लामिक विद्यालय दारूल उलूम देवबंदने काढला आहे.
लखनऊ - बँकेत नोकरी करून हरामाचा (अनैतिक) पैसा कमावणा-या कुटुंबांना टाळून लग्न जुळवताना धार्मिक वृत्तीच्या कुटुंबांचा विचार करा, असा फतवा इस्लामिक विद्यालय दारूल उलूम देवबंदने काढला आहे.
एका व्यक्तीला विवाहासाठी प्रस्ताव आले होते. त्या कुटुंबांतील वडील भारतातील बँकेत नोकºया करून पैसा कमावत आहेत. जी कुटुंबे ‘हराम’ पैसा कमावत आहेत अशा कुटुंबांत विवाह करणे श्रेयस्कर ठरेल का, अशी विचारणा त्या व्यक्तीने दारूल उलुमच्या फतवा विभागाकडे (दारूल इफ्ता) केली होती.
यावर देवबंदने म्हटले की अशा कुटुंबांत लग्न करणे टाळावे. ज्यांचे पालनपोषण हराम संपत्तीवर झालेले असते, ते लोक स्वभाव व नीतिमत्तेबाबतीत चांगले नसतात. धार्मिक वृत्तीच्या कुटुंबात जोडीदार शोधावा. इस्लामिक कायदा किंवा शरीयत ठरावीक कालावधीसाठी
पैसे उसने दिल्यावर त्यावर व्याज, वा शुल्क (रिबा) आकारायची मुभा देत नाही. (वृत्तसंस्था)