म्हणे पठाणकोट हे भारताचेच नाटक

By admin | Published: April 6, 2016 04:45 AM2016-04-06T04:45:41+5:302016-04-06T08:14:25+5:30

पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणारे चार दहशतवादी पाकिस्तानी होते हे कबूल केल्यानंतर काही दिवस उलटत नाही तोच पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) कोलांट उडी मारत

Say Pattankot is the only Indian play | म्हणे पठाणकोट हे भारताचेच नाटक

म्हणे पठाणकोट हे भारताचेच नाटक

Next

नवी दिल्ली : पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणारे चार दहशतवादी पाकिस्तानी होते हे कबूल केल्यानंतर काही दिवस उलटत नाही तोच पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) कोलांट उडी मारत पठाणकोट हल्ला म्हणजे पाकला बदनाम करण्यासाठी भारतानेच रचलेले नाटक होते, असा आरोप केला आहे.
जेआयटीच्या या आरोपाबाबतचे वृत्त ‘पाकिस्तान टुडे’त प्रसिद्ध झाले आहे. पठाणकोटच्या तपासासाठी नुकतेच भारतात येऊन गेलेले हे पथक पंतप्रधान नवाज शरीफ यांना अहवाल सादर करणार आहे. या अहवालाची माहिती जेआयटीच्या एका सूत्राने पाकिस्तान टुडेला दिली.
भारताला हल्ला होण्यापूर्वीच दहशतवाद्यांविषयी माहिती होती, असा भयंकर निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. जेआयटीने एनआयए अधिकारी तंजील अहमद यांच्या हत्येचाही संदर्भ दिला आहे. उत्तर प्रदेशात शनिवारी झालेल्या या हत्येतून भारत हे प्रकरण दडपत असल्याचे स्पष्ट होते, असेही या अहवालात नमूद आहे. भारतीय लष्कर आणि कथित दहशतवादी यांच्यातील संघर्ष अवघ्या काही तासांत संपला. यावरून हा हल्ला पाकची प्रतिमा मलिन करण्यासाठी रचलेले नाट्य होते, असे स्पष्ट होते. हल्ल्याच्या रात्री तळावरील दिवे सुरू नव्हते. यावरून भारताला दहशतवाद्यांची आधीच माहिती होती की काय असा स्वाभाविक प्रश्न उपस्थित होतो, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानी माध्यमे किंवा जेआयटीने भारतावर पुरावे लपविल्याचा आरोप करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असे आरोप करण्यात आलेले आहेत. भारतीय अधिकाऱ्यांनी जेआयटीला पुरावे व माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे वृत्त दुनिया न्यूज या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने २८ मार्च रोजी दिले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)४पाकिस्तानी जेआयटीच्या या अहवालाबाबत आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे याच जेआयटीने काही दिवसांपूर्वी हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे कबूल केले होते. एवढेच नाहीतर या दहशतवाद्यांचे जैश-ए-मोहंमद या संघटनेशी संबंध जोडण्याइतपत पुरेसे पुरावे आपल्याकडे असल्याचेही म्हटले होते.हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचे डीएनए अहवाल, दूरध्वनी नोंदी आणि पठाणकोट हवाई तळाच्या कमांडरची माहिती जेआयटीला देण्यात आली नाही, असे डेली टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे, तर हल्ल्याबाबत भारत सरकार आणि सीमा सुरक्षा दलाच्या भूमिकेतच विरोधाभास असल्याचा दावा दुनिया न्यूजच्या वृत्तात करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी दहा फूट उंचीच्या संरक्षक भिंतीवर चढून पठाणकोट हवाई तळावर प्रवेश केल्याचे भारतीय प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, दहशतवाद्यांनी चढाईसाठी वापरलेले दोरखंड कुठेही आढळून आले नाहीत, असेही या अहवालात नमूद आहे.

Web Title: Say Pattankot is the only Indian play

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.