म्हणो, स्मृती इराणींच्या नशिबात राष्ट्रपतीपद!

By admin | Published: November 25, 2014 01:23 AM2014-11-25T01:23:46+5:302014-11-25T01:23:46+5:30

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या नशिबात राष्ट्रपती होण्याचा ‘राजयोग’ आह़े एका ज्योतिष्याने स्मृती इराणींच्या हस्तरेषा बघून हे भविष्य वर्तविले आह़े

Say, Smriti Irani's destined President! | म्हणो, स्मृती इराणींच्या नशिबात राष्ट्रपतीपद!

म्हणो, स्मृती इराणींच्या नशिबात राष्ट्रपतीपद!

Next
ज्योतिषाचे भाकीत : हा अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार, काँग्रेसची खरमरीत टीका
भिलवाडा(राजस्थान)/नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या नशिबात राष्ट्रपती होण्याचा ‘राजयोग’ आह़े एका ज्योतिष्याने स्मृती इराणींच्या हस्तरेषा बघून हे भविष्य वर्तविले आह़े  दरम्यान ज्योतिष्याला हात दाखवणा:या इराणींवर काँग्रेसने जोरदार प्रहार केला असून इराणींनी ज्योतिषाला हात दाखवणो म्हणजे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार असल्याची टीका केली आह़े 
 भिलवाडाच्या करोरी गावात नथूलालजी नामक 8क् वर्षाचे ज्योतिषी राहतात़ अलीकडे राजस्थानच्या खासगी दौ:यावर असताना स्मृती इराणी नथूलालजींकडे गेल्या. येत्या पाच वर्षात तुम्ही देशाच्या राष्ट्रपती व्हाल, असे नथूलालजी यांनी इराणींच्या हस्तरेषा पाहिल्यानंतर सांगितल़े 
खुद्द नथूलालजी यांनीच पत्रकारांसमक्ष इराणींच्या नशिबात देशाच्या सर्वोच्चपदी बसण्याचा योग असल्याची माहिती दिली़ नथूलालजी यांच्यावर इराणींची प्रगाढ श्रद्धा आह़े केवळ इराणीच नाहीत तर नथूलालजींकडे राजकारणातील अनेक दिग्गज आपले भविष्य जाणून घेण्यासाठी येतात़ यात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि राज्यसभा खासदार अमरसिंग यांचाही समावेश असल्याचे कळत़े (वृत्तसंस्था)
 
4स्मृती इराणींच्या खांद्यावर देशाच्या भावी नागरिकांना दिशा देण्याची जबाबदारी आह़े अशास्थितीत त्याच कर्माऐवजी नशिबावर अवलंबून राहत असतील तर देशातील नवपिढी दिशाहीन झाल्याशिवाय राहणार नाही, अशी बोचरी टीका राजस्थान काँग्रेसने केली आह़े
 
 भारत हा कर्मप्रधान देश आह़े 
 
4ज्योतिष्यावर विश्वास ठेवणो हा वैयक्तिक आस्थेचा भाग आह़े पण एका जबाबदार खात्याच्या मंत्रिपदी असताना अशा कृत्यातून त्या केवळ अंधश्रद्धेला वाव देत आहेत़ निवडणुकीत पराभव होऊनही इराणींना मंत्रिपद मिळाल़े कदाचित नशिबानेच त्यांना हे मिळाले आह़े म्हणूनच त्या कर्मापेक्षा नशिबावर अधिक अवलंबून दिसतात, असे प्रदेश काँग्रेस प्रवक्त्या डॉ़ अर्चना शर्मा म्हणाल्या़
 
इराणींची मीडियावर आगपाखड
4ज्योतिष्याला हात दाखवल्यानंतर निर्माण झालेल्या वादावरुन स्मृती इराणींनी मीडियावर जोरदार आगपाखड केली़ मला माहिती आहे, टीआरपी वाढविण्यासाठी तुम्ही अशा बातम्या दाखवता़ असाच टीआरपी वाढवा़ मला असेच प्रकाशझोतात ठेवा़ वैयक्तिक आयुष्यात मी कुठे जाते, काय करते, हा माझा खासगी प्रश्न आह़े 
4मीडियाला यात रस घेण्याची गरज नाही़ 8क् टक्के राजकारणी ज्योतिष्याकडे जातात वा ज्योतिषी त्यांना भेटतात़ तुम्ही माङयासारख्या महिलेच्याच मागे का पडले आहात? असे प्रसारमाध्यमांना उद्देशून त्या म्हणाल्या़

 

Web Title: Say, Smriti Irani's destined President!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.