गंगा मातेचं बोलावणं आलंय, असं सांगत जलसमाधीसाठी नदीत उतरली महिला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 05:30 PM2021-09-07T17:30:57+5:302021-09-07T17:34:21+5:30
Women inter into river Ganga for Jalasamadhi: एका महिलेने गंगा मातेचं बोलावणं आलंय, असं सांगत जलसमाधीसाठी गंगा नदीमध्ये प्रवेश केला.
रांची - झारखंडमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने गंगा मातेचं बोलावणं आलंय, असं सांगत जलसमाधीसाठी गंगा नदीमध्ये प्रवेश केला. (Women inter into river Ganga for Jalasamadhi) दरम्यान, ही वार्ता वाऱ्याच्या वेगाने आसपासच्या भागात पसरली आणि बघत बघता त्या ठिकाणी हजारो लोक जमा झाले. भजन-कीर्तनही सुरू झाले. दरम्यान, या प्रकाराची माहिती स्थानिक पोलिसांना समजली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या महिलेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यामध्ये आणले. मात्र या कारवाईवेळी लोकांकडून विरोध झाला. या महिलेला सोडण्याची मागणी ते करत होते. तसेच त्यासाठी साहिबगंज बाजाराचा मुख्य रस्ताही लोकांनी बंद केला. (Saying that Mata Ganga has been called, the woman went down to the river for Jalasamadhi )
मिळत असलेल्या माहितीनुसार ही घटना साहिबगंजमधील चानन गावातील आहे. येथील रहिवासी सुदामा रविदास याची पत्नी रीता देवी गिने सोवमारी सकाळी २४ तासांच्या जलसमाधीचा संकल्प घेऊन गंगेमध्ये प्रवेश केला. आपल्याला आईने बोलावले आहे, असा दावा ती करत होती. तसेच मंगळवारी ती गंगेतून सुखरूप बाहेर येईल, असे सांगत होती. तिच्या पतीने सांगितले की, ती गंगेची भक्त आहे. आपल्याला गंगा मातेने बोलावले आहे, असे सांगित्यावर मी तिला घेऊन गंगेच्या किनारी आलो आणि तिथे पूजा सुरू केली, असे त्याने सांगितले.
या प्रकरणी जिरवाबाडी ओपीचे प्रभारी सुनील कुमार यांनी सांगितले की, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. तसेच गंगा नदीला उधाण आलेले आहे. तिने गंगेत जलसमाधीसाठी प्रवेश केला होता. मानवी जीवनाचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. मात्र पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केला. या लोकांचीही समजूत घालण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.