काश्मीरमध्ये जैशच्या दहशतवाद्यांची घुसखोरी; मोठा घातपात घडवण्याचा कट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 07:33 AM2019-08-12T07:33:19+5:302019-08-12T07:36:11+5:30

आज किंवा स्वातंत्र्य दिनाच्या आधी मोठा हल्ला घडवण्याचा कट

Says Intelligence says seven Terrorists Infiltrate Into Jammu And Kashmir Planning Massive Attack On Eid | काश्मीरमध्ये जैशच्या दहशतवाद्यांची घुसखोरी; मोठा घातपात घडवण्याचा कट

काश्मीरमध्ये जैशच्या दहशतवाद्यांची घुसखोरी; मोठा घातपात घडवण्याचा कट

Next

श्रीनगर: जैश-ए-मोहम्मदच्या सात दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला करण्याच्या उद्देशानं जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली आहे. इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियानं गुप्तचर विभागातील सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. घुसखोर दहशतवादी ईद (आज) किंवा स्वातंत्र्य दिनाच्या आधी मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.  

भारतात दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयनं जैश-ए-मोहम्मदला हिरवा कंदील दाखवला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी घोषित करण्यात आलेला मसूद अजहर जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आहे. जास्तीत जास्त जीवितहानी होईल अशा भागांमध्ये हल्ले करा, अशी सूचना आयएसआयकडून जैशला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. घुसखोर दहशतवादी एखाद्या मशिदीवर हल्ला करू शकतात. त्यामुळे पाकिस्तानला भारतावर आरोप करण्याची संधी मिळेल, असा अंदाज सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैशच्या सात दहशतवाद्यांनी बनिहालच्या दक्षिण आणि पीर पंजालच्या पर्वतील भागातून घुसखोरी केली आहे. सध्या हे दहशतवादी राजौरी किंवा पूँछमध्ये लपले असावेत, अशी शक्यता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं व्यक्त केली. 'सात दहशतवादी अनंतनाग हायवे आणि त्याच्या आसपासच्या भागात हल्ले घडवू शकतात. त्यांच्याकडून नागरी वस्त्या आणि सुरक्षा दलांची कार्यालयं लक्ष्य केली जाऊ शकतात,' असा अंदाज दक्षिण काश्मीर दलातील सूत्रांनी वर्तवला. 

मोदी सरकारनं गेल्याच आठवण्यात कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय जम्मू-काश्मीरचं 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आलं. नेमक्या याच पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट समोर आला आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ट्विटरवर प्रचंड सक्रीय झाले आहेत. मुस्लिम देशांना भारताविरुद्ध भडकावण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपा सरकारची तुलना त्यांनी थेट जर्मनीतील नाझींशी केली आहे. 
 

Web Title: Says Intelligence says seven Terrorists Infiltrate Into Jammu And Kashmir Planning Massive Attack On Eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.