म्हणतात, पत्नीला गायब करा..!

By admin | Published: July 16, 2016 02:46 AM2016-07-16T02:46:11+5:302016-07-16T02:46:11+5:30

जादूच्या खेळाने चरितार्थ चालविणे सोपे नाही हे लोकांना समजावून सांगणे हे आपल्या व्यावसायिक जीवनासमोरील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे प्रसिद्ध जादूगार करणसिंग यांनी म्हटले आहे.

Says, wife disappear ..! | म्हणतात, पत्नीला गायब करा..!

म्हणतात, पत्नीला गायब करा..!

Next

नवी दिल्ली : जादूच्या खेळाने चरितार्थ चालविणे सोपे नाही हे लोकांना समजावून सांगणे हे आपल्या व्यावसायिक जीवनासमोरील सर्वांत मोठे आव्हान असल्याचे प्रसिद्ध जादूगार करणसिंग यांनी म्हटले आहे.
जादूने काल्पनिक जगताची सैर घडविणारा हा नव्या दमाचा जादूगार म्हणाला की, मी जे करतो ते सामान्य नाही. मी चरितार्थासाठी जादूचे खेळ करतो हे लोकांना समजावून सांगणे सोपे नाही; मात्र, हळूहळू लोकांची धारणा बदलत आहे. त्यांचा जादूतील रस आता वाढू लागला आहे.
मी जादूगार असल्याचे पुरुषांना कळताच ते माझ्याकडे विचित्र आग्रह धरतात. आपल्या पत्नीला बेपत्ता करावे अशी त्यांची विनंती असते; परंतु मी त्या प्रकारची जादू करीत नाही. मी लोकांना बेपत्ता करीत नाही. जादूगार म्हटले की, तुम्हाला डोक्यावर मोठी गोल टोपी घातलेली आणि त्यातून जिवंत ससा बाहेर काढणारी व्यक्ती आठवेल; मात्र मी त्या प्रकारचा जादूगार नाही.
मी माझ्या प्रेक्षकांप्रमाणेच सामान्य कपडे घालतो आणि कोणत्याही साधनांचा वापर न करता लोकांना आपली कला दाखवू शकतो. मी देशभरात १००हून अधिक शो केले असून, आंतरराष्ट्रीय जादूगार डॅरेन ब्राऊन आणि पेन एंड टेलर यांच्यासोबत काम केले आहे, असे ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Says, wife disappear ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.