लय भारी! SBI ATM येणार तुमच्या दारी; केवळ व्हॉट्सअॅप मॅसेज करावा लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 01:14 PM2020-08-22T13:14:25+5:302020-08-22T13:26:19+5:30
SBI Mobile ATM: यासाठी इंटरनेटवर 'SBI ATM near me' टाईप करण्याची किंवा एटीएम केंद्रात जाण्याची गरज नाही. एक मेसेज किंवा कॉल केल्यास एसबीआय मोबाील व्हॅन दारात येणार आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरच्या महामारीमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी एसबीआय (SBI) ने एक भन्नाट कल्पना लढविली आहे. पैसे काढण्यासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाहीय. SBI ATM तुमच्या दारी येऊन पोहोचणार असून स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) या योजनेला सुरुवातही केली आहे.
यासाठी तुम्हाला इंटरनेटवर 'SBI ATM near me' टाईप करण्याची किंवा एटीएम केंद्रात जाण्याची गरज नाही. तर केवळ एक व्हॉट्सअॅप (WhatsApp) मेसेज केल्यावर एसबीआयचे मोबाईल एटीएम तुमच्या दारात येऊन पोहोचणार आहे.
स्टेट बँकेचे लखनऊचे मुख्य व्यवस्थापक जय कुमार खन्ना यांन याबाबतचे ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी लखनऊ सर्कलमध्ये SBI WhatsApp आणि SBI phone call service सुरु केल्याची घोषणा केली आहे. एसबीआयची ही योजना यशस्वी झाल्यास देशभरातील अन्य शहरामध्येही राबविली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
This Independence Day @TheOfficialSBI for the Lucknowites has introduced the facility of Mobile ATM at their doorstep. Just dial or WhatsApp to let us know and we will do the rest.#SafeBanking
— Ajay Kumar Khanna (@AjayKhannaSBI) August 17, 2020
Proud partners with @radiocityindiapic.twitter.com/puQgjIfjXr
भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ही सेवा सुरु करण्यात येत असल्याचे खन्ना म्हणाले. यासाठी एसबीआयला एक WhatsApp message किंवा एसबीायच्या नंबरवर फोन करावा लागणार आहे. पुढचे काम आम्ही करणार आहोत, असे खन्ना म्हणाले. जर लखनऊमध्ये शनिवारी, रविवारी लॉकडाऊन असेल आणि एटीएममधून पैसे काढायचे असतील तर निश्चिंत रहा, तुमच्याकडे एसबीआय एटीएमची मोबाईल व्हॅन येईल, असे ते म्हणाले.
यासाठी त्यांनी मोबाईल नंबरही दिला असून 7052-911-911 यावर नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक पाठविण्याचे आवाहन त्यांनी केला आहे. तसेच सोसायटीही रजिस्टर करता येणार आहे. महिला आणि वरिष्ठ नागरिकांसाठी प्रामुख्याने ही सुविधा देण्यात येत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
धक्कादायक! महिलेवर 143 जणांचा बलात्कार, लैंगिक अत्याचार; 42 पानी FIR दाखल
पंजाब बॉर्डरवर BSF ची मोठी कारवाई; पाच पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले
अफाट संपत्ती! तीन किलो सोने, दोन किलो चांदी, नोटांच्या थप्प्या; टीडीपीच्या नेत्यावर सीबीआयचा छापा
शिबू सोरेन यांना कोरोना; झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही होणार टेस्ट
सोनू सूदचे 'ते' ट्विटर खाते बनावट; म्हणाला ''लवकरच अटक होणार''
65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य
वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द