खुशखबर! SBI ने बदलला 'हा' नियम; ४४ कोटी ग्राहकांना कर्जासाठी फायदा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 07:04 PM2020-09-04T19:04:03+5:302020-09-04T19:05:35+5:30

बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Sbi changed mclr linked loan reset frequency to 6 months from 1 year | खुशखबर! SBI ने बदलला 'हा' नियम; ४४ कोटी ग्राहकांना कर्जासाठी फायदा होणार

खुशखबर! SBI ने बदलला 'हा' नियम; ४४ कोटी ग्राहकांना कर्जासाठी फायदा होणार

Next

भारतातील सगळ्यात मोठ्या बँकांपैकी असलेल्या एसबीआयनं ग्राहकांना  मोठी खुशखबर दिली आहे. कोरोना काळात अगदी सर्वसामान्य नागरिकांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. असे असतानाच बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एसबीआयनं किरकोळ कर्जासाठी असलेला व्याजदराचा कालावधी (MCLR) रीसेट फ्रीक्वेंसीला एक वर्षांवरून हटवून सहा महिने केला आहे. याचा फायदा एसबीआयच्या गृह कर्ज, वाहनकर्ज आणि  वैयक्तिक कारणासाठी  कर्ज  घेत असलेल्या ग्राहकांना होणार आहे. 

एसबीआयनं ट्विटरवरून याबाबच माहिती दिली आहे. आता ग्राहक १ वर्ष  वाट न पाहताही कमी व्याजदराचा  फायदा घेऊ शकतील. एसबीआयने एमसीएलआर रीसेट फ्रीक्वेंसीचा कालावधी ६ महिन्यांचा केलाआहे. आधी ग्राहकांना व्याजदर कमी होण्यासाठी १ वर्ष वाट पाहावी लागत होती. 

जुलैमध्ये दर कमी होते

सध्या एसबीआयचा एका वर्षाचा एमसीएलआर दर ७ टक्के आहे.  तर सहा महिन्यांचा एमसीएलआर दर ६.९५ टक्के आहे. जुलैमध्ये एसबीआयने शॉर्ट टर्म एमलीएलआरच्या दरांमध्ये कपात केली होती. 

एमसीएलआर म्हणजे काय 

बँकिंग क्षेत्रात नियामक आणि रिझर्व्ह बँकेनं १ अप्रिल २०१६ पासून देशात मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग यांच्या आधारावर एमसीएलआर ची सुरूवात केली होती. याआधी बँकेच्या दरावरून व्याज दर ठरवला जात होता.

एसबीआयच्या 44 कोटी ग्राहकांसाठी खूशखबर! स्टेट बँक ऑफ इंडियाची मोठी घोषणा

मेट्रो शहरांमध्ये ATM मधून महिन्याला 8 वेळा पैसे काढण्याची मुभा -

स्टेट बँक मेट्रो शहरांमध्ये एका ATM कार्डाद्वारे महिन्याला ८ वेळा विनाशुल्क पैसे काढण्याची मुभा देते. याचाच अर्थ जर तुम्ही मेट्रो शहरात राहत असाल तर तुम्हाला कोणतेही शुल्क न आकारता ८ वेळा पैसे काढता येणार आहेत. मात्र, यानंतर केल्या जाणाऱ्या प्रत्येक ट्रान्झेक्शनवर तुम्हाला शुल्क आकारले जाणार आहे. SBI ATM मधून फ्री पैसे काढण्याच्या नियमांनुसार (ATM Withdrawal Rules) स्टेट बँकेच्या एटीएममधून ५ वेळा आणि अन्य बँकांच्या एटीएममधून तीन वेळा पैसे काढता येतात. मेट्रो शहरांमध्ये मुंबई,  नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद सहभागी आहेत. 

लॉकडाउनमध्ये सुरू केली SBIची बनावट शाखा, तिघांना अटक; अशी झाली पोल-खोल

छोट्या शहरांतील SBI ग्राहकांना एटीएममधून 10 वेळा पैसे काढता येणार - 

याशिवाय गैर मेट्रो शहरांमध्ये SBI चे खातेधारक 10 वेळा एटीएममधून विनाशुल्क पैसे काढू शकतात. यामध्ये 5 वेळा SBI ATM मधून आणि 5 वेळा अन्य बँकांच्या एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. ही लिमिट संपल्यानंतर बँक तुमच्याकडून 10 रुपये ते 20 रुपये शुल्क वसूल करू शकते. 

 कमाईची मोठी संधी! Yes Bank निम्म्या दराने शेअर विकणार

10000 रुपयांपेक्षा अधिक पैसे काढताना OTP पाठवला जाणार -

याशिवाय खातेधारकाला एटीएममधून 10000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढायची असेल तर त्याला त्याच्या मोबाईलवर ओटीपी (OTP) पाठवला जाईल. तो ओटीपी पुन्हा एटीएममध्ये टाकून पैसे काढता येणार आहेत. ही ओटीपीची सुविधा रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएमधून पैसे काढत असाल तर ओटीपी पाठविला जाणार नाही. 

Read in English

Web Title: Sbi changed mclr linked loan reset frequency to 6 months from 1 year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.