SBI चा ठेवीदारांना मोठा धक्का; मे महिन्यातच दोनदा व्याजदर घटविले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 02:49 PM2020-05-27T14:49:20+5:302020-05-27T14:51:58+5:30
आरबीआयने गेल्याच आठवड्यात रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात केली होती.
देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकने दोन आठवड्यांत पुन्हा एकदा ठेवीदारांना मोठा धक्का दिला आहे. SBI ने दुसऱ्यांदा एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. हे नवे व्याजदर आजपासून म्हणजेच २७ मेपासूनम लागू होणार आहेत.
आरबीआयने गेल्याच आठवड्यात रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात केली होती. कोरोनाच्या संकटात सापडलेल्या अर्थव्य़वस्थेला बुस्टरडोस देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. आज एसबीआयने या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. SBI ने आजपासून फिक्स डिपॉझिटवरील व्य़ाजदरात ०.४० टक्क्यांची कपात केली आहे. आरबीआयच्या रेपोरेट वाढीच्या निर्णयाला सर्वात प्रथम एसबीआयच प्रतिसाद देते. यानंतर इतर बँका निर्णय घेतात.
या आधी मे महिन्यातच एसबीआयने व्याजदरात कपात केली होती. १२ मे रोजी हा निर्णय घेतला होता. ३ वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजामध्ये ०.२० टक्क्यांची कपात करण्यात आली होती. तर मोठ्या ठेवी ज्या २ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या आहेत त्याच्या व्याजावर 0.50 टक्क्यांची कपात केली होती. या कॅटेगरीमध्ये बँक तीन टक्के व्याज देते. या कॅटॅगरीलाही नवीन व्याजदर आजपासूनच लागू होणार आहेत.
नुकसान कोणाला?
व्याजदरातील ४० टक्के कपातीचे सर्वाधिक नुकसान व्य़ाजावर अवलंबून असलेल्या वरिष्ठ नागरिकांना होणार आहे. गेल्याच महिन्यात एसबीआयने त्यांच्यासाठी नवीन स्कीम लागू केली होती. यामध्ये बँक त्यांना ०.८० टक्के जास्त व्याज देत होती. ही स्कीम २० सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
तेरी मेहरबानिया! कोरोनामुळे मालक गमावला; तीन महिने झाले कुत्रा हॉस्पिटमध्ये वाट पाहतोय
चोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली
थकलेल्या EMI वरील व्याजवसुली थांबणार? आरबीआयला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
ठोश्याला ठोसा! चीनचे जेवढे सैनिक तेवढेच भारताचे जवान होणार तैनात
प्रेमवीराने प्रेयसीला भेटविण्याची गळ घातली; सोनू सुदने दिले खतरनाक उत्तर
धक्कादायक! चीनची कोरोनाविरोधावर मोठी चाल; दोन युद्धनौका तैवानच्या दिशेने रवाना