एसबीआयचा विक्रम! 10 हजार फूट उंचीवर उघडली नवी शाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 10:28 AM2019-09-15T10:28:37+5:302019-09-15T10:29:14+5:30
एसबीआयचे संचालक रजनीश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
लेह : लडाखला केंद्र शासित प्रदेश केल्यानंतर आता तेथे सरकारी संस्थांना शिरकाव करता येत आहे. मंत्रिमंडळाबरोबरच आता विविध संस्था, प्रशासनांनी विस्तार करण्यास सुरुवात केली असून देशातील सर्वांत उंचीवर बँक खोलण्याचा मान एसबीआयने मिळविला आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये लडाख येत होते. यामुळे लडाखमध्येपण राज्य सरकारची बँक आघाडीवर होती. पण केंद्र सरकारने 370 कलम रद्द करत लडाखला वेगळे केल्याने देशाच्या सरकारी बँकांना विकासासाठी महत्वाची भूमिका निभावण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. यामुळे एसबीआय सरकारी योजनांसाठी पुढाकार घेणार आहे.
एसबीआयचे संचालक रजनीश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. कुमार यांनी शनिवारी सांगितले की, लडाखमधील दिस्कित शहारात 10,310 फूट उंचीवर एसबीआयने शाखा खोलली आहे. लडाखमधील ही 1४ वी शाखा आहे. आणखी दोन दुर्गम भागांमध्ये शाखा खोलण्यासाठी प्रस्ताव ठेवलेला आहे.
देशाच्या दूर असलेल्या भागांमध्येही बँकिंग सेवा पुरविण्याची नीती एसबीआयने तयार केली असून एसबीआयने लष्कराच्या लेह येथील 14 कॉर्प्सच्या मुख्यालयाला अत्याधुनिक अॅम्बुलन्सही दिली असल्याचे त्यांनी सांगितले.