SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट! 'हे' काम न केल्यास अकाऊंट होईल फ्रीझ, जाणून घ्या, नेमकं काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 02:25 PM2022-06-11T14:25:17+5:302022-06-11T14:29:16+5:30

State Bank of India : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या युजर्सना अनेक सुविधा पुरवते.

sbi update know how to submit kyc documents online do not worry about frauds | SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट! 'हे' काम न केल्यास अकाऊंट होईल फ्रीझ, जाणून घ्या, नेमकं काय? 

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी अलर्ट! 'हे' काम न केल्यास अकाऊंट होईल फ्रीझ, जाणून घ्या, नेमकं काय? 

Next

नवी दिल्ली - भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या युजर्सना अनेक सुविधा पुरवते. यापैकी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे केवायसी. जर तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल आणि तुम्ही अद्याप केवायसी केले नसेल, तर तुमचे खाते फ्रीझ केले जाऊ शकते म्हणजेच बंद केले जाऊ शकते. त्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यातून कोणताही व्यवहार करू शकणार नाही. 

KYC तपशील अपडेट करण्याची सुविधा आता ऑनलाइन सुरू झाली आहे. ज्यामुळे ग्राहकांना शाखेत न जाता घरून KYC कागदपत्रे पाठवता येतात. तुमचे खाते अनफ्रीझ करण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठी, तुम्हाला KYC करणे आवश्यक आहे. भारतात कोरोना आणि लॉकडाऊन सुरू झाल्यापासून, SBI बँकेने KYC कागदपत्रे ऑनलाइन स्वीकारण्यास सुरुवात केली.

ऑनलाइन केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, नरेगा कार्ड, पॅन कार्ड

अल्पवयीन व्यक्तीसाठी आवश्यक कागदपत्रे

जेथे अल्पवयीन व्यक्तीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी आहे, अकाउंट चालविणाऱ्या व्यक्तीचा ओळखपत्र पुरावा सादर करावा लागेल.

अनिवासी भारतीयांसाठी आवश्यक KYC कागदपत्रे

परराष्ट्र कार्यालय, नोटरी पब्लिक, भारतीय दूतावास संबंधित बँकांचे अधिकारी ज्यांच्या स्वाक्षऱ्या बँकेच्या अधिकृत (A/B श्रेणी फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ब्रँच) शाखेद्वारे पडताळण्या योग्य आहेत.

जाणून घ्या, प्रोसेस

- केवायसी करण्यासाठी सर्वप्रथम ग्राहकांना त्यांचा पत्ता पुरावा आणि ओळखीचा पुरावा स्कॅन करावा लागेल आणि तो त्यांच्या शाखेच्या अधिकृत मेल आयडीवर पाठवावा लागेल. 

- ई-मेल फक्त नोंदणीकृत ईमेलवरून पाठवायचा आहे. 

- जर तुमचा केवायसी दस्तऐवज पूर्ण झाला नसेल तर तुम्ही केवायसी दस्तऐवज ऑनलाइन पाठवा. 

- जी कागदपत्रे पाठवायची आहेत, त्यात तुमचा पत्ता पुरावा सोबत पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, नरेगा कार्ड, पॅन कार्ड. 

- अल्पवयीन व्यक्तीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असल्यास ते खाते चालवणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र द्यावे लागेल. 

- खातेधारकाचे वय दहा वर्षांपेक्षा जास्त असेल, तेव्हा त्यांना इतर सर्वांप्रमाणे KYC कागदपत्रे देखील प्रदान करावी लागतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: sbi update know how to submit kyc documents online do not worry about frauds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.