दिल्लीतील प्रदूषणावरुन सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 05:27 PM2018-10-29T17:27:09+5:302018-10-29T17:28:35+5:30
दिल्लीतील प्रदूषणावरुन सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सोशल मीडियावर अकाउंट सुरु करण्याचा आदेश दिला आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणावरुन सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला सोशल मीडियावर अकाउंट सुरु करण्याचा आदेश दिला आहे.
दिल्लीतील प्रदूषणाबाबत नागरिक तक्रार करु शकतील, यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने लवकरात लवकर सोशल मीडिया अकाउंट सुरु करावे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तसेच, 10 वर्षे जुन्या डिझेलच्या आणि 15 वर्षे जुन्या पेट्रोलच्या वाहनांवर बंदी घालण्यास आणि आपल्या संकेतस्थळावर जुन्या वाहनांची यादी अपलोड करण्यास सुप्रीम कोर्टाने दिल्ली परिवहन विभागाला सांगितले आहे. याचबरोबर, दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणावर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे.
SC asks Central Pollution Control Board to open social media account where citizens can complain regarding pollution in Delhi. SC asks Delhi transport dept to add on its website,list of more than 10 yr old diesel&more than 15 yr old petrol vehicles so that they can be impounded. pic.twitter.com/eRctUNJQkV
— ANI (@ANI) October 29, 2018
धुके आणि धुळीमुळे रहिवासी हैराण...
शहरातील वाढते प्रदूषण चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषत: मागील काही दिवसांपासून वायुप्रदूषणात वाढ झाली आहे. हवेतील धुळीचे प्रमाण वाढले आहे. सकाळच्या वातावरणात धुके आणि धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे.