न्यायालयातील खटल्यांच्या सुनावणीचं आता थेट प्रक्षेपण होणार, SCचा ऐतिहासिक निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 01:16 PM2018-09-26T13:16:05+5:302018-09-26T13:26:17+5:30
सर्वोच्च न्यायालयानं आज अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत.
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं आज अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. काही महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या कार्यवाहीचं थेट प्रक्षेपण करण्यास सर्वोच्च न्यायालयानं तयारी दर्शवली आहे. मात्र अयोध्या आणि आरक्षणासंदर्भातील संवेदनशील प्रकरणं सोडून इतर खटल्यांचं थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. याची सुरुवात सर्वोच्च न्यायालयातूनच होणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता देशहिताच्या प्रकरणांची सुनावणी तुम्हाला लाइव्ह पाहता येणार आहे. थेट प्रक्षेपणामुळे थेट युक्तिवाद पाहता येणं शक्य होणार आहे, लाइव्ह प्रक्षेपणामुळे जनतेला थेट सुनावणी पाहता येणार असून, सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारात पारदर्शकता येईल.
Supreme Court allows live streaming of court proceedings, says, 'it will start from the Supreme Court. Rules have to be followed for this. Live streaming of court proceedings will bring accountability into the judicial system." pic.twitter.com/UAWZVV9DcA
— ANI (@ANI) September 26, 2018
या प्रकरणावर 24 ऑगस्ट रोजी निर्णय राखून ठेवण्यात आला होता. न्यायालयातील थेट प्रक्षेपणामुळे पारदर्शकता वाढणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. परंतु त्याला प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्याचा विचार सुरू आहे.
गेल्या सुनावणीवेळी अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितलं होतं की, न्यायालयात होणारी सुनावणी लाइव्ह पाहायला मिळाली पाहिजे. वकिलांची शिस्त कायम ठेवणं गरजेचं आहे. वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह म्हणाल्या, वकिलांची शिस्त कायम ठेवण्यासाठी एक नियमावलीही बनवली जाईल.