मी SC, मी ST...विद्यार्थ्यांनी छातीवर कोरली जात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 06:32 PM2018-05-01T18:32:22+5:302018-05-01T19:41:52+5:30
मध्य प्रदेशमधल्या धार जिल्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल भरतीदरम्यान विद्यार्थ्यांनी चक्क छातीवर जात कोरल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
भोपाळ- मध्य प्रदेशमधल्या धार जिल्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल भरतीदरम्यान विद्यार्थ्यांनी चक्क छातीवर जात कोरल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी मी SC, मी ST असं छातीवर लिहिल्याचं आरोग्य तपासणीदरम्यान उघड झालं आहे. यानंतर या प्रकाराला जोरदार विरोध होऊ लागला आहे. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा(NHRC)नं मध्य प्रदेश सरकारला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे.
तर अल्फाबेट रुग्णालयात कोणत्या तरी अधिका-यानं या विद्यार्थ्यांच्या छातीवर जात लिहिल्याची शक्यता धारच्या सीएमएचओ डॉ. आरसी पनिका यांनी व्यक्त केली आहे. त्या अधिका-यांनी कोणाच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांच्या छातीवर जात लिहिली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सीएमएचओनं याचा तपास डॉ. केसी शुक्ला आणि डॉ. एस पटेल यांच्याकडे सोपवला आहे. प्राथमिक चौकशीत दीपक नावाच्या एका अधिका-यानं हा प्रकार केल्याचं उघड झालं आहे.
National Human Rights Commission (NHRC) issues notices to the Government of Madhya Pradesh over stamping of castes on the bare chests of aspiring constables from the reserved categories in Dhar
— ANI (@ANI) May 1, 2018
एससी-एसटी ही एक जात नव्हे, तर तो पूर्ण समूह आहे, असंही सिव्हिल सर्जन एसके खरे म्हणाले आहेत. तसेच छातीवर जात लिहून जात दाखवण्याचा उद्देश नव्हता. तर आरक्षित वर्गातील असल्याचं दाखवायचं असावं, असंही ते अधिकारी म्हणाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एसपी बीरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी अनेक विद्यार्थी आले आहेत. त्यामुळे वैद्यकीय चाचणीदरम्यान अशी घटना घडली असावी. परंतु तरीही विद्यार्थ्यांच्या छातीवर असं लिहिलं योग्य नाही.