पीएम किसान सन्मान निधीमध्ये गडबड-घोटाळा, रजिस्ट्रेशन न करताच खात्यात येताहेत पैसे

By बाळकृष्ण परब | Published: December 16, 2020 11:26 AM2020-12-16T11:26:50+5:302020-12-16T11:30:59+5:30

PM Kisan Sanman Nidhi News : गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली होती.

The scam in PM Kisan Sanman Nidhi, money is coming into the account without registration | पीएम किसान सन्मान निधीमध्ये गडबड-घोटाळा, रजिस्ट्रेशन न करताच खात्यात येताहेत पैसे

पीएम किसान सन्मान निधीमध्ये गडबड-घोटाळा, रजिस्ट्रेशन न करताच खात्यात येताहेत पैसे

Next
ठळक मुद्देप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये हे तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातातया योजनेमध्ये गडबड-घोटाळा होत असल्याच्या बातम्या वारंवार येत असतातआता तर ज्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली नाही, अशा लोकांच्या खात्यातही या योजनेचे पैसे जमा होत असल्याचे समोर आले आहे

नवी दिल्ली - गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये हे तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. मात्र या योजनेमध्ये गडबड-घोटाळा होत असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. अनेक ठिकाणी अपात्र लोकांच्या खात्यात पैसे जमा होतात. आता तर ज्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली नाही, अशा लोकांच्या खात्यातही या योजनेचे पैसे जमा होत असल्याचे समोर आले आहे.

मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत UIDAI आणि TRAI चे माजी प्रमुख असलेल्या रामसेवक शर्मा यांच्या बँक खात्यामध्ये यावर्षी पीएम किसान सन्मान योजनेमधून तीन हप्त्यांमध्ये पैसे जमा झाले आहेत. मात्र शर्मा यांनी या योजनेसाठी आपल्या नावाची नोंदणी केली नव्हती. मी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठेही नोंदणी केलेली नव्हती. तरीही माझ्या नावाची नोंद झाली आहे. याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकाने ओळख न पटवता खाते पात्र कसे ठरवले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

शर्मा यांनी सांगितले की, पीएन किसान सन्मान निधी योजनेंतर्गत माझ्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये तीन वेळा पाठवण्यात आले. शर्मा यांच्या नावाने हे खाते ८ जानेवारी रोजी उघडण्यात आल होते. तसेच ते सुमारे नऊ महिने अ‍ॅक्टिव्ह होते. अखेर २४ सप्टेंबर रोजी हे खाते डिअ‍ॅक्टिव्हेट झाले. उत्तर प्रदेशमधील फिरोझाबाद जिल्ह्यात एक शेतकरी म्हणून माझे नाव रजिस्टर झाले होते. दरम्यान, याची माहिती मिळाल्यानंतर मी याबाबत बँकेला कळवले आहे. मात्र त्याचे अद्याप उत्तर मिळालेले नाही. मी या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहे कारण मी प्राप्तिकर भरतो, असे त्यांनी सांगितले.

अभिनेता भगवान हनुमान, आयएसआय गुप्तहेर महबूब अख्तर आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या नावानेसुद्धा पीएम किसान योजनेची खाती बनली आहेत. त्यांची आधारकार्ड उपलब्ध आहेत. हनुमानच्या खात्यात सहा हजार, महबूब अख्तरच्या खात्यात चार हजार तर रितेश देशमुखच्या खात्यात या योजनेचे दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

Web Title: The scam in PM Kisan Sanman Nidhi, money is coming into the account without registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.