SCAM म्हणजे सपा, काँग्रेस, अखिलेश व मायावती - मोदी

By admin | Published: February 4, 2017 04:01 PM2017-02-04T16:01:50+5:302017-02-04T16:31:56+5:30

उत्तर प्रदेश विधानसभेची ही निवडणूक म्हणजे भाजपासाठी 'स्कॅम'विरोधातील ( सपा, काँग्रेस, अखिलेश व मायावती) लढाई असल्याची टीका मोदींनी केली.

SCAM is SP, Congress, Akhilesh and Mayawati - Modi | SCAM म्हणजे सपा, काँग्रेस, अखिलेश व मायावती - मोदी

SCAM म्हणजे सपा, काँग्रेस, अखिलेश व मायावती - मोदी

Next
ऑनलाइन लोकमत
मेरठ, दि. ४ - उत्तर प्रदेश विधानसभेची ही निवडणूक म्हणजे भाजपासाठी 'स्कॅम'विरोधातील लढाई आहे. आणि हे 'स्कॅम' म्हणजे - 'सपा, काँग्रेस, अखिलेश आणि मायावती ' आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीकास्त्र सोडले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेरठमधील सभेत बोलताना त्यांनी समाजवादी पक्षासह काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
'काँग्रेसवाले उत्तर प्रदेश सरकारला बदनाम करत होते, त्यांच्या कारभारावर टीका करत होते. मग, रातोरात असं काय घडलं, की हे दोन्ही पक्ष गळ्यात गळे घालून अचानक एकत्र आले' असा प्रस्नही मोदींनी विचारला. ' जे पक्ष गेली काही दशके, रात्रंदिवस एकमेकांवर सतत टीका करून दुस-याला संपवण्याता प्रयत्न करत होते. ते आता अचानक एकत्र येऊन, गळ्यात गळे घालून वाचवा, वाचवा अस ओरडत आहेत. जे स्वत:चा बचाव करू शकत नाहीत, ते उत्तर प्रदेशला काय वाचवणार?' असा खडा सवाल मोदींनी विचारला. ' मी दिल्लीवरून उत्तर प्रदेशला मदत करण्याचा प्रयत्न केला, तरी राज्य सरकारची इच्छा नसल्यामुळे हा पैसा दुसरीकडेच  जातो' असा घणाघाती आरोपही मोदींनी केला. उत्तर प्रदेशचे भाग्य बदलायचे असेल, तर येथील सरकार बदलण्याची गरज आहे, असे सांगत मोदींनी मतदारांना भाजपला मतदान करून सत्ता देण्याचे आवाहन केले. 

Web Title: SCAM is SP, Congress, Akhilesh and Mayawati - Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.