भयावह, उन्हाळा सुरु झाला नाही अन् देशातील १३ नद्या पूर्णपणे आटल्या, गंगा तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 02:15 PM2024-04-02T14:15:06+5:302024-04-02T14:17:33+5:30

Water Crisis in India: महाराष्ट्रातीलही अनेक नद्या आटल्या, आयोगाकडे देशातील अतिमहत्वाच्या अशा २० नद्यांच्या बेसिनचा लाईव्ह डेटा असतो. यापैकी १२ नद्यांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा कमी पाणी आहे.

Scary, summer has not started and there is no water in 13 rivers of the country, Ganga water Storage on 41 percent Water crisis in India | भयावह, उन्हाळा सुरु झाला नाही अन् देशातील १३ नद्या पूर्णपणे आटल्या, गंगा तर...

भयावह, उन्हाळा सुरु झाला नाही अन् देशातील १३ नद्या पूर्णपणे आटल्या, गंगा तर...

सारे लोकसभा निवडणुकीत मश्गुल असले तरी हा उन्हाळा लोकांना तहाणेने व्याकूळ करणार आहे. केंद्रीय जल आयोगाचा अहवाल भयावह असून हा उन्हाळा कसा जाणार, असा मोठा प्रश्न देशवासियांसमोर उभा ठाकला आहे. देशातील १३ नद्यांमधील पाणीच पूर्णपणे संपलेले आहे. तर गंगा, ब्रह्मपुत्र, सिंधु, पेन्नार, नर्मदा, तापी, साबरमती, गोदावरी, महानदी, कावेरी यांचे पाणी गेल्या वर्षीपेक्षा वेगाने आटत चालले आहे. 

सर्वाधिक चिंता गंगा नदीने दिली आहे. ही नदी ११ राज्यांतून वाहते व काठच्या 2.86 लाख गावांमध्ये शेती आणि पिण्यासाठी पाणी पुरविते. भारतात एकूण नदी, तलाव अशी १५० महत्वाची जलाशये आहेत. या जलाशयांमध्ये आता ३६ टक्केच पाणी उरलेले आहे. यापैकी ८६ जलाशयांमध्ये ४० टक्के पाणी आहे. आयोगाने २८ मार्चची आकडेवारी जारी केली आहे. यापैकी सर्वाधिक जलाशये ही दक्षिणी राज्ये, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहेत.

देशातील नद्या या जीवनवाहिन्याच नाहीत तर ट्रान्सपोर्ट आणि वीज उत्पादनासाठीही मदतगार ठरतात. या नद्यांमुळे सामाजिक आणि आर्थिक विकास होतो. आयोगाकडे देशातील अतिमहत्वाच्या अशा २० नद्यांच्या बेसिनचा लाईव्ह डेटा असतो. यापैकी १२ नद्यांमध्ये गेल्यावर्षीपेक्षा कमी पाणी आहे. कावेरी, पेन्नार आणि कन्याकुमारीच्या भागातील पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांना सर्वात मोठे नुकसान झाले आहे. 

गंगेमध्ये क्षमतेच्या निम्म्याहून कमी पाणी आहे. गंगानदीचे पाणी आटणे हे शेतीला प्रभावित करणार आहे. गंगेच्या खोऱ्यातील ६५ टक्के भाग हा शेतीचा आहे. नर्मदेवर ४६ टक्के शेती, तापीवर ५६, गोदावरीवर ३४ आणि महानदीवर ४९ टक्के शेत जमिन अवलंबून असते. 

रुशिकुल्या, वराह, बाहुदा, वंशधारा, नागावली, सारदा, तांडव, एलुरु, गुंडलकम्मा, तम्मिलेरु, मुसी, पलेरु आणि मुनेरु य़ा नद्यांचे पात्र सपशेल आटले आहे. या नद्यांद्वारे 86,643 वर्ग किलोमीटर जमीन ओलिताखाली येते. IIT गांधीनगरनुसार अनेक भाग हा असाधारण दुष्काळाच्या झळा सोसू लागला आहे. 

Web Title: Scary, summer has not started and there is no water in 13 rivers of the country, Ganga water Storage on 41 percent Water crisis in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.