लखनऊ- आगरा एक्स्प्रेस वेवर नऊ विद्यार्थ्यांना बसने चिरडलं, सात जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 09:46 AM2018-06-11T09:46:51+5:302018-06-11T09:46:51+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे.
कन्नोज- उत्तर प्रदेशच्या लखनऊ- आगरा एक्प्रेस वेवर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. कन्नोज येथे सकाळी झालेल्या अपघातात बसने नऊ शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडलं. यामध्ये सहा विद्यार्थी व एका शिक्षकाचा मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Nine students run over by a bus on Agra-Lucknow Expressway near Kannauj. Six dead, three admitted to hospital in critical condition.
— ANI UP (@ANINewsUP) June 11, 2018
बसमधील डिझेल संपलं असल्याने विद्यार्थ्यांची बस थांबली होती. यावेळी एका बसने विद्यार्थ्यांना चिरडलं ज्यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला असल्याची माहिती मिळते आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना दोन लाख रूपये व जखमींना 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.
CM Yogi Adityanath announces Rs 2 lakhs each for the kin of those killed in the bus accident in Kannauj. Rs 50,000 each for those injured
— ANI UP (@ANINewsUP) June 11, 2018