धक्कादायक! ८ वी पास व्यक्तीकडून रेझर ब्लेडनं सीझरचा प्रयत्न; महिलेसह बाळ दगावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 03:58 PM2021-03-20T15:58:41+5:302021-03-20T16:00:35+5:30

सीझर करणाऱ्या व्यक्तीला आणि रुग्णालयाच्या मालकाला पोलिसांकडून अटक

in up School dropout performs caesarean section woman her child bleed to death | धक्कादायक! ८ वी पास व्यक्तीकडून रेझर ब्लेडनं सीझरचा प्रयत्न; महिलेसह बाळ दगावलं

धक्कादायक! ८ वी पास व्यक्तीकडून रेझर ब्लेडनं सीझरचा प्रयत्न; महिलेसह बाळ दगावलं

googlenewsNext

लखनऊ: शालेय शिक्षण अर्धवट सोडलेल्या व्यक्तीनं एका महिलेची प्रसुती केल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. व्यक्तीनं रेझर ब्लेडच्या सहाय्यानं महिलेचं सीझर करण्याचा प्रयत्न केला, परंतु गर्भवती महिलेसह अर्भकाचा मृत्यू झाला. प्रशासनाकडे नोंद नसलेल्या एका रुग्णालयात ही घटना घडली.

सुलतानपूरमधल्या सैनी गावात बुधवारी रात्री ३० वर्षीय व्यक्तीनं महिलेची प्रसुती केली. राजेंद्र शुक्ला असं या व्यक्तीचं नाव असून त्याचं शिक्षण आठवीपर्यंत झालं आहे. शुक्ला सैना गावातल्या माँ शारदा रुग्णालयात काम करतो. हे रुग्णालय राजेश सहानी नावाच्या मालकीचं आहे. त्यांनी शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी राजेंद्र शुक्लाकडे सोपवली होती.

महिला आणि बाळ दगावल्यानंतर तिच्या पतीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर शुक्ला आणि सहानी यांना अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे केवळ काही सुईणांच्या मदतीनं सहानी संपूर्ण रुग्णालय चालवत होता. या रुग्णालयात राजाराम नावाच्या व्यक्तीनं त्याची पत्नी पूनमला प्रसुतीसाठी दाखल केलं होतं. मात्र प्रसुतीदरम्यान तिचा मृत्यू झाला आणि बाळदेखील दगावलं. यानंतर राजारामनं पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर माँ शारदा रुग्णालयात सुरू असलेला धक्कादायक प्रकार समोर आला.

राजेश सहानी प्रशासनाकडे कोणतीही नोंदणी करता, परवानगी न घेता रुग्णालय चालवत असल्याची माहिती तपासातून पुढे आल्याचं सुलतानपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद चतुर्वेदींनी सांगितलं. या रुग्णालयात रेझर ब्लेडच्या मदतीनं प्रसुती केली जात होती. अनेक अत्यावश्यक सुविधांचा रुग्णालयात अभाव होता. तपासादरम्यान आम्हाला मोठा हलगर्जीपणा दिसून आला, अशी माहिती चतुर्वेदींनी दिली.

Web Title: in up School dropout performs caesarean section woman her child bleed to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.