मोठी बातमी! 21 सप्टेंबरपासून देशभरातील शाळा सुरू होणार, 'या' 10 गोष्टींचं पालन करावं लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 02:15 PM2020-09-09T14:15:05+5:302020-09-09T14:15:33+5:30

कोरोना विषाणूमुळे 16 मार्च रोजी शाळा व महाविद्यालये यासह देशातील शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या.

school reopen from 21 september know everything here | मोठी बातमी! 21 सप्टेंबरपासून देशभरातील शाळा सुरू होणार, 'या' 10 गोष्टींचं पालन करावं लागणार

मोठी बातमी! 21 सप्टेंबरपासून देशभरातील शाळा सुरू होणार, 'या' 10 गोष्टींचं पालन करावं लागणार

Next

कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे शाळा,  कॉलेज बंद आहेत. पण मोदी सरकारनं आता शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने 9वी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याअंतर्गत 21 सप्टेंबरपासून नववी ते 12 वीपर्यंतचे विद्यार्थी मोदी सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शाळेत जाऊ शकतील. कोरोना विषाणूमुळे 16 मार्च रोजी शाळा व महाविद्यालये यासह देशातील शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या.

21 सप्टेंबरपासून शाळा 9 ते 12वी पर्यंत सुरू होतील
केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यासाठी एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया म्हणजेच एसओपी जारी केली आहे. याअंतर्गत केवळ 9 वी ते 12 वीपर्यंतचे विद्यार्थीच शाळेत जाऊन शिकू शकतील. तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व नियमांचे पालन करावे लागणार  आहे. 

50 टक्के शिक्षक शाळेत येणार
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एका वेळी शाळांमध्ये 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावले जाऊ शकते. ज्या शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी लावण्याची पद्धत आहे, तेथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी इतरही काही व्यवस्था असणे आवश्यक आहे. जर शाळा विद्यार्थ्यांसाठी वाहन व्यवस्था करीत असेल तर दररोज नियमितपणे वाहनाची स्वच्छता करावी लागेल.

संपूर्ण खबरदारी घेतली जाणार
शाळांना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने खबरदारीदेखील घ्यावी लागेल. शाळांमध्ये थर्मल स्कॅनर आणि नाडी ऑक्सिमीटरची उपलब्धता असणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांसह संपूर्ण कर्मचार्‍यांचे थर्मल स्कॅनिंग शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी करावे लागेल. याशिवाय त्यांचे हातही स्वच्छ करावे लागतात. शिक्षक व इतर कर्मचार्‍यांना शाळेमार्फत फेस मास्क आणि हँड सॅनिटायझर्स देण्यात येतील. शाळा दररोज उघडण्यापूर्वी संपूर्ण परिसर, सर्व वर्ग, प्रॅक्टिकल लॅब आणि बाथरूम सोडियम हायपोक्लोराइट सोल्युशनद्वारे स्वच्छ केले जातील.

'या' भागातील विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाहीत
कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थी, शिक्षक आणि इतर शालेय कर्मचारी यांच्या आगमनावर निर्बंध.
वृद्ध, आजारी आणि गर्भवती महिला शाळेपासून दूर राहतील.
जर कोणाला थर्मल स्कॅनिंगमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा संशय आला असेल, तर त्याला वेगळे केले जाईल आणि आरोग्य विभाग, पालकांना त्याबद्दल कळविले जाईल.

'या' गोष्टींचं पालन करावं लागणार
बंद खोल्यांऐवजी वर्ग खुल्या जागेत घेतले जाऊ शकतात.
शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील इतर कर्मचारी यांना कमीत कमी 6 फूट अंतर ठेवावे लागेल.
सामाजिक अंतरासाठी जमिनीवर सहा फूटांच्या खुणा असतील.
प्रत्येक वर्गाच्या अभ्यासासाठी वेगळा वेळ ठरविला जाईल.
विद्यार्थी कॉपी, पुस्तक, पेन्सिल, पेन, पाण्याची बाटली यांसारख्या गोष्टी एक-दुसऱ्याला देऊ शकणार नाहीत.
विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचार्‍यांना सतत हात धुवावे लागतील. तसेच फेस मास्क घालावा लागेल.
शाळांमध्ये सकाळची प्रार्थना करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, त्यांच्यासाठी ऑनलाइन वर्ग सुरू राहतील.
शाळेतील कॅन्टीन बंद राहतील
व्यावहारिक प्रयोगशाळेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांमधील अंतर ठेवण्यासाठी लहान संख्येने बॅच बनविल्या जातील. प्रयोगशाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी 4 चौरस मीटर गोलाकार काढला जाईल.

Web Title: school reopen from 21 september know everything here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा