पिकनिक म्हणून शाळकरी विद्यार्थी निघाले होते पाकव्याप काश्मीरमध्ये
By admin | Published: July 21, 2015 03:48 PM2015-07-21T15:48:23+5:302015-07-21T15:48:23+5:30
शाळेला दांडी मारुन जम्मू काश्मीरमधील चार शाळकरी विद्यार्थी पिकनिक म्हणून थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये निघाले होते.
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २१ - शाळेला दांडी मारुन जम्मू काश्मीरमधील चार शाळकरी विद्यार्थी पिकनिक म्हणून थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये निघाले होते. सुदैवाने सीमा रेषेजवळ भारतीय सैन्याच्या जवानांनी या विद्यार्थ्यांना रोखले व त्या मुलांची सुखरुप घरी रवानगी केली.
उत्तर काश्मीरमधील हंदवारा गावात सैन्याने सामाजिक जबाबदारी म्हणून स्थानिक मुलांसाठी एक शाळा सुरु केली आहे. या शाळेत शिकणारे आठवीतील चार विद्यार्थी २ जुलैरोजी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. यानंतर चौघांनी शाळेचा गणवेश बदलून साधे कपडे घातले. इंटरनेट व गुगल मॅपच्या आधारे या चौघांनी सीमा रेषेकडे जाण्याचा मार्ग धरला. सीमा रेषेपासून जवळच भारतीय सैन्याच्या जवानांनी या शाळकरी विद्यार्थ्यांना थांबवले व त्यांना स्थानिक पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आले. पोलिसांनी या विद्यार्थ्यांची चौकशी केली असता त्यांनी पिकनिक म्हणून पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात होतो अशी कबूली दिली. . दहशतवादी गटांकडून या विद्यार्थ्यांना बोलवणे आले असू शकते. आम्ही याचा तपास करत आहोत, पण सध्या या चौघांना समुपदेशन करुन घरी सोडून दिले अशी माहिती पोलिसांनी दिली.