शाळा वार्ता: एमराल्डच्या एरोबिक्स संघाला ७ पदक

By admin | Published: December 2, 2014 12:36 AM2014-12-02T00:36:01+5:302014-12-02T00:36:01+5:30

अकोला: शिर्डी येथे झालेल्या स्पोर्टस् एरोबिक्स, फिटनेस एरोबिक्स आणि हिपहाप युनिटी चॅम्पियनशिप -२०१४ स्पर्धा झाली. यामध्ये एमराल्ड हाईटस् स्कूलच्या कशीश गुरबानी हिने सुवर्णपदक पटकाविले. इशा गवई, धनश्री इंगळे, वैष्णवी गोरे, स्वाती जाधव, भाग्येश तायडे, गौरी गोरे यांनी कांस्यपदक मिळविले. यज्ञेश तायडे, अंजली पातोडे, मयूरी राठोड यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. प्रशिक्षिका सपना वीरघट यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. शाळा संचालिका अल्फा तुलशान, प्राचार्य निर्मल शर्मा, क्रीडा विभागप्रमुख शिवाजी चव्हाण, मुकुंद खंडारे यांनी खेळाडूंचे कौतुक केले. (क्रीडा प्रतिनिधी)

School talk: Emerald's Aerobics team wins 7 medals | शाळा वार्ता: एमराल्डच्या एरोबिक्स संघाला ७ पदक

शाळा वार्ता: एमराल्डच्या एरोबिक्स संघाला ७ पदक

Next
द्राबाद मुक्तीसंग्रामात निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढताना एकाचवेळी ३५ शूरविरांना हौतात्म्य आलेल्या कंधार तालुक्यातील कल्हाळी गावालाही दुष्काळी झळा बसत आहेत़ त्यामुळे या गावाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सरपंच प्रेमला सोनकांबळे यांनी केली आहे़
ग्रामविकास मंत्री पकंजाताई मुंडे यांना याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे़ त्यानुसार, स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतर गावाचा विकास झाला नाही़ त्यात आता अस्मानी संकटाने रहिवाशांवर उपासमारीची वेळ आली आहे़ अवेळी झालेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे़ काही दिवसांपूर्वी गावातील शेतीची पाहणी करुन आणेवारीचे प्रमाण ३६ दर्शविण्यात आली होती़ परंतु ती १० ते २० च्या दरम्यानच आहे़ गावात दोन वर्षापासून रोजगार हमी योजनेची कामे नाहीत़ त्यामुळे गावकरी इतर ठिकाणी स्थलांतर करीत आहेत़ निजामाच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लढा देणार्‍या या गावातील शेतकर्‍यांवर मात्र आता अस्मानी संकटामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे़ त्यामुळे ऐतिहासिक अशा या गावाला शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी सरपंच सोनकांबळे यांनी केली आहे़

Web Title: School talk: Emerald's Aerobics team wins 7 medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.