विद्यार्थ्यांना अद्यापही वेट अँड वॉच, 31 ऑगस्टपर्यंत शाळा अन् कॉलेजेस बंदच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 07:55 PM2020-07-29T19:55:26+5:302020-07-29T22:40:15+5:30

देशातील लॉकडाऊन हळू हळू कमी करण्यात येत आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये अद्यापही कडक लॉकडाऊन सुरूच राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Schools and colleges will remain closed till August 31, strict lockdown in the containment zone | विद्यार्थ्यांना अद्यापही वेट अँड वॉच, 31 ऑगस्टपर्यंत शाळा अन् कॉलेजेस बंदच राहणार

विद्यार्थ्यांना अद्यापही वेट अँड वॉच, 31 ऑगस्टपर्यंत शाळा अन् कॉलेजेस बंदच राहणार

googlenewsNext

नवी दिल्ली - केंद्र सरकारने अनलॉक-3 साठी गाईडलाइंस जारी केल्या आहेत. गृह मंत्रालयाने जारी केल्या या गाईडलाइंसनुसार कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन राहणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, देशातील सर्वच राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशमधील प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर देशातील शाळा आणि महाविद्यालये 31 ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

देशातील लॉकडाऊन हळू हळू कमी करण्यात येत आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये अद्यापही कडक लॉकडाऊन सुरूच राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशांतर्गत वैयक्तिक प्रवासाला विनापरवाना परवानगी देण्यात आली आहे. तर, 5 ऑगस्टपासून जीम व योगासही परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच, वैयक्तिक प्रवासासाठी सरकारने नाइट कर्फ्यूही हटवला आहे. मात्र, चित्रपटगृहे, मनोरंजन सभागृह, शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहेत. 


केंद्र सरकारच्या नवीन गाईडलाईननुसार 15 ऑगस्टच्या ध्वजारोहन कार्यक्रमासाठी काही मागर्दर्शक सूचनाही करण्यात आल्या आहेत. कमीत कमी संख्येत आणि मास्क व सोशल डिस्टन्सचे पालन करत, ध्वजारोहन समारंभ घेण्यात येईल, असेही केंद्राने म्हटले आहे.
 

Web Title: Schools and colleges will remain closed till August 31, strict lockdown in the containment zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.