शाळा, महाविद्यालये सुरू होणार १५ ऑगस्टनंतरच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 06:34 AM2020-06-08T06:34:41+5:302020-06-08T07:21:34+5:30
केंद्रीय मंत्री : त्याआधी सर्व परीक्षांचे निकाल
नवी दिल्ली : देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये १५ आॅगस्टनंतरच सुरू होतील, अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळमंत्री रमेश पोखरीयल, निशंक यांनी येथे केली.
एका वृत्तवाहिनीला त्यांनी दिलेल्या मुलाखतीमुळे शाळा व महाविद्यालये कधी सुरू होणार, याविषयीची संदिग्धता संपली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन घोषित केल्यामुळे देशभरातील सर्व शिक्षणसंस्था मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून बंद आहेत. त्यामुळे काही परीक्षा झालेल्या नाहीत आणि काही वर्गातील मुलांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी घेतला. तसेच ज्या परीक्षा झाल्या आहेत, त्यांचे अद्याप निकालही लागलेले नाहीत. सर्व परीक्षांचे निकाल आॅगस्टपर्यंत लागतील, अशी ग्वाही पोखरीयाल यांनी दिली.