School Reopening: लहान मुलांच्या शाळा सुरू करू नका, जाणकारांनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 11:44 AM2021-07-22T11:44:24+5:302021-07-22T11:44:32+5:30
School Reopening News: दिल्ली मेडिकल काउंसिलचे अध्यक्ष आणि पीडिएट्रिक्स डॉक्टर अरुण गुप्ता म्हणाले की, ज्या देशात शाळा सुरू झाल्या, तिथे रुग्ण वाढले.
नवी दिल्ली: सीरो सर्व्हे रिपोर्टच्या आधारावर आयसीएमआरने लहान मुलांच्या शाळा सुरू करण्याबाबत भाष्य केलं आहे. पण, रिपोर्टमध्ये लहान-मोठे मुलं आणि अडल्टमध्ये अँटीबॉडी सापडण्याचे प्रमाण फक्त 5 ते 10 टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे, अजून दोन-तीन महिने वाट पाहावी, असं काही डॉक्टरांचं मत आहे. 6 ते 9 वयोगटातील 57.2 मुलांमध्ये अँटीबॉडी मिळाल्या आहेत, म्हणजे ज्या 40 कोटी लोकांना अजूनही संक्रमणाचा धोका आहे, त्यातील अर्धे लहान मुलं आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या शाळा सुरू करण्यास घाई करू नये, असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
'जिथे शाळा सुरू झाल्या, तिथे कोरोना रुग्ण वाढले'
दिल्ली मेडिकल काउंसिलचे अध्यक्ष आणि पीडिएट्रिक्स डॉक्टर अरुण गुप्ता सांगतात की, ज्या देशांमध्ये शाळा सुरू केल्या, त्या ठिकाणी कोरोना रुग्ण वाढले. त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी घाई करू नये. तसेच, ज्या मुलांमध्ये अँटीबॉडी मिळाल्या ते पुन्हा संक्रमित होणार नाही, याची काय शास्वती आहे. अशी मुले संक्रमित झाल्यावर सुपर स्प्रेडर ठरू शकतात, असेही गुप्ता म्हणाले.
सर्व्हेत लहान मुलांमध्ये 57 टक्के अँटीबॉडी मिळाल्या
मेदांताच्या पीडिएट्रिक्स डॉक्टर नीलम मोहन यांनी सांगितले की, मागच्या सर्व्हेच्या तुलनेत या सर्व्हेमधून मुलांमध्ये अँटीबॉडी वाढल्याचे प्रमाण दिसून आले आहे. 6 ते 9 वयोगटातील मुलांमध्ये 57.2 टक्के अँटीबॉडी मिळाल्या, तर 10 ते 17 वयोगटातील मुलांमध्ये 61.6 टक्के अँटीबॉडी आढळल्या. यांची एकूण टक्केवारी 67.6 आहे. यातून मुलेही संक्रमित होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्यास घाई करू नका. राज्यातील परिस्थिती पासून त्या-त्या राज्य सरकारांनी शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच, शाळा सुरू करण्यापूर्वी एक फुल प्रुफ प्लॅन तयार करावा, असंही मत नीलम यांनी व्यक्त केलंय.