नोएडा व गाझियाबादमध्ये शाळा बंद; एकाच शाळेतील १० विद्यार्थी झाले विषाणूबाधित 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 09:09 AM2022-04-14T09:09:34+5:302022-04-14T09:10:07+5:30

नोएडा व गाझियाबादमध्ये १० विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

Schools closed in Noida and Ghaziabad 10 students from the same school became infected | नोएडा व गाझियाबादमध्ये शाळा बंद; एकाच शाळेतील १० विद्यार्थी झाले विषाणूबाधित 

नोएडा व गाझियाबादमध्ये शाळा बंद; एकाच शाळेतील १० विद्यार्थी झाले विषाणूबाधित 

googlenewsNext

नवी दिल्ली :

नोएडा व गाझियाबादमध्ये १० विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्याने तेथील शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 
कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर दिल्ली व एनसीआरमध्ये कोरोनाचे सर्व निर्बंध उठविण्यात आले आहेत. सर्व शाळांचे वर्गही सुरू झाले आहेत. परंतु, गाजियाबाद व नोएडातील शाळेत १२ विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यामुळे प्रशासन हादरून गेले आहे. यामुळे पालकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच शाळेतील १० विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे प्रशासनाने नोएडा व गाझियाबाद शहरातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. केवळ खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे गाझियाबादचे जिल्हा निगराणी अधिकारी डॉ. राकेश गुप्ता यांनी म्हटले.

 देशात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे १,०८८ रुग्ण आढळले तर २६ जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूंत एकट्या केरळमधील १९ जणांचा समावेश आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून १०,८७० झाली आहे तर कोरोनामुळे देेशात मरण पावलेल्यांची एकूण संख्या ५,२१,७३६ झाली आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राबवण्यात आलेल्या देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत लसीच्या १८६.०७ कोटी मात्रा दिल्या गेल्या आहेत.

पालकांनी घाबरू  नये - केजरीवाल
नोएडा व गाझियाबाद येथे कोरोनाग्रस्त विद्यार्थी आढळून आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, दिल्लीतील पालकांनी घाबरू नये, असे आवाहन केले आहे. दिल्लीतील शाळांमधील विद्यार्थ्यांची पुरेशी काळजी घेतली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

शांघायमधील भारताची वकिलात सध्या बंद
 चीनचे व्यावसायिक शहर शांघायमध्ये कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्यामुळे येथील भारतीय वकिलातीने व्यक्तिश: भेटीची सेवा बंद केली आहे. शांघायमध्ये २६ दशलक्ष लोक राहतात. कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे चीनच्या कोरोना महामारीला रोखण्यासाठीच्या धोरणाबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे. पूर्व चीनमधील प्रांतात राहत असलेले भारतीय नागरिक बीजिंगमधील भारतीय दूतावासातील सेवा घेऊ शकतील, असे दूतावासाने सूचनेत म्हटले आहे.

निर्बंध हटताच हरियाणातही रुग्ण वाढले
1. दिल्लीजवळ असलेल्या हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एक महिन्यानंतर कोरोनाचे नवे १२९ रुग्ण आढळले. मास्क वापरण्याचे बंधन राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर हे रुग्ण वाढले.
2. दिल्ली सरकारने मास्क न वापरल्यास दंड न आकारण्याचे ठरवल्यावर तेथेही रुग्णांची संख्या वाढली. 
3. ४ मार्च रोजी गुरुग्राममध्ये कोरोनाचे नवे ११५ रुग्ण आढळले होते. त्यानंतर ते १०० च्या खाली आले होते. हरियाणा सरकारने १६ फेब्रुवारी रोजी कोविडशी संबंधित सगळे निर्बंध मागे घेतले.

Web Title: Schools closed in Noida and Ghaziabad 10 students from the same school became infected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.