वेदांमधून मिळालेली विज्ञानाची मूलभूत तत्त्वे, परदेशी लोकांनी कॉपी केली; इस्रोच्या प्रमुखांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 09:45 AM2023-05-25T09:45:26+5:302023-05-25T09:45:45+5:30

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की, विज्ञानाची मूलभूत तत्त्वे वेदांमध्ये होती जी अरबस्तानातून पाश्चात्य जगात पोहोचली.परदेशी लोक त्या ज्ञानाचे रिपॅकेज करत आहेत.

science was originated from vedas western people repackaged only said isro chief | वेदांमधून मिळालेली विज्ञानाची मूलभूत तत्त्वे, परदेशी लोकांनी कॉपी केली; इस्रोच्या प्रमुखांचा दावा

वेदांमधून मिळालेली विज्ञानाची मूलभूत तत्त्वे, परदेशी लोकांनी कॉपी केली; इस्रोच्या प्रमुखांचा दावा

googlenewsNext

'वेद हे विज्ञानाचे मूळ आहे, पण हे ज्ञान अरबस्तानातून पाश्चात्य देशांमध्ये पोहोचले आणि तेथील शास्त्रज्ञांनी आपल्या नावाने त्याचा प्रचार केला. बीजगणित, वर्गमूळ, काळाची गणना, स्थापत्यशास्त्र, विश्वाचा आकार, धातूविज्ञान आणि विमान चालवणे हे वेदांमध्ये प्रथम शिकले, असा दावा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी केला आहे.

एस. सोमनाथ म्हणाले, समस्या अशी होती की हे ज्ञान संस्कृत भाषेत होते आणि ही भाषा लिहिली जात नव्हती. लोक एकमेकांकडून ज्ञान घ्यायचे आणि लक्षात ठेवायचे. पुढे ती लिहिण्यासाठी देवनागरी लिपी वापरली गेली. ते उज्जैनच्या महर्षी पाणिनी संस्कृत आणि वेद विद्यापीठात संबोधित करत होते. पाणिनीने संस्कृतचे व्याकरण लिहिले.

नवीन संसद भवनाच्या उद्धाटन सोहळ्यासाठी ४ विरोधी पक्षांनी दिली मोदी सरकारला साथ

एस. सोमनाथ म्हणाले, अभियंते आणि शास्त्रज्ञांना संस्कृत खूप आवडते. ही भाषा संगणकासाठी अतिशय सोपी आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ती सहज वाचू शकते. संस्कृतचा वापर गणनेत कसा करता येईल यावर बरेच संशोधन चालू आहे. ते म्हणाले की, भारतात संस्कृतमध्ये निर्माण झालेले साहित्य केवळ साहित्यिक दृष्टिकोनातूनच नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे. संस्कृतमधील सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि वैज्ञानिक अभ्यास यात फरक नाही.

एस.सोमनाथ म्हणाले की, भारतीय शास्त्रज्ञांनी त्यांचे संशोधन प्राचीन काळापासून संस्कृतमध्ये लिहिले आहे, पण नंतर त्यावर फारसे संशोधन झाले नाही. आठव्या शतकात लिहिलेले सूर्यसिद्धांत हे याचे उदाहरण आहे. या पुस्तकात पृथ्वीचा परिघ, सूर्यमाला आणि अनेक गोष्टी लिहिल्या होत्या, ज्याचे श्रेय पाश्चिमात्य जगाने नंतर सांगितले आणि स्वतःचे श्रेय घेतले. इस्रो सध्या अनेक मोठ्या मोहिमांवर काम करत आहे. यामध्ये चांद्रयान-3 मिशन आणि आदित्य-1 मिशनचा समावेश आहे. चंद्र आणि सूर्य यांचा अभ्यास करणे हा त्यांचा उद्देश आहे.

Web Title: science was originated from vedas western people repackaged only said isro chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :isroइस्रो