CoronaVirus News: ...तर देशात कोरोनाचे अधिक घातक स्ट्रेन तयार होण्याची भीती; शास्त्रज्ञ चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 07:44 PM2021-05-11T19:44:57+5:302021-05-11T19:45:22+5:30
CoronaVirus News: देशातील शास्त्रज्ञांचं पंतप्रधान मोदींना पत्र; प्लाझ्मा थेरेपीच्या वापराबद्दल चिंता व्यक्त
- सचिन कोरडे
भारताच्या काही डॉक्टर्स, सार्वजनिक आरोग्य तज्ञ आणि शास्त्रज्ञांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांना नुकतेच एक पत्र लिहिले आहे. कोविड १९ बाधित रूग्णांना दिल्या जाणाऱ्या प्लाझा थेरपीचा उपयोग होत नसल्याचे अभ्यासानंतर समोर येत असून प्लाझ्मा थेरपीच्या अतार्किक वापरामुळे अधिक घातक स्ट्रेन निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. असे झाले तर महामारीत अधिक भर पडेल.
प्लाझ्मा थेरपीच्या आग्रहामुळे कोविड १९ मधून बऱ्या झालेल्या रूग्णांना, त्यांच्या कुटुंबियांना नैतिक दबाव आणि त्रासाचा सामना करावा लागतो, हे टाळता येईल. त्यामुळे तातडीची बाब म्हणून यात लक्ष घालून आयसीएमआर आणि एम्स यांनी निर्देशित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा पूर्णविचार करून त्यात संशोधन आधारित नवी मार्गदर्शक तत्वे द्यावीत, अशी विनंती केली आहे.
धक्कादायक! ऑक्सिजन पाईप काढून कोरोना बाधितेला जीवे मारण्याचा प्रयत्न; दोन वॉर्डबॉय पसार
प्लाझा थेरपीच्या आग्रहामुळे त्यात काळा बाजार होत असल्याचे देखील समोर आले आहे. काही ठिकाणी रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना प्लाझ्मा मिळवून देण्याचा भरभक्कम मोबदला मागितला जात असल्याचे समोर आले आहे. तसेच काही रक्तपेढ्यांकडून बदली दाता देण्याची अट ठेवली जाते आहे.
मृत्यूनंतर घरच्यांनी अन् गावकऱ्यांनी पाठ फिरवली; महिला तहसिलदाराने PPE किट्स घालून केले अंत्यसंस्कार
प्लाझ्मा दानासाठी मोठी चळवळ उभी राहिली आहे. अनेक स्वयंसेवक स्वतःहून पुढाकार घेऊन या चळवळीत योगदान देत आहेत. बरे झालेले कोविड रुग्ण शोधून यादी तयार करणे, गरजू रुग्णांची साचेबद्ध माहिती भरून घेणे, त्यांचा समन्वय साधून देणे अतिशय उदात्त हेतूने केले जात आहे. यामागे व्यापक सामाजिक हित आणि महामारीविरुद्ध लढण्याची प्रबळ प्रेरणा असली तरी यांच्यापर्यंत त्याची वैज्ञानिक तथ्य पोहोचली पाहिजे. त्यासाठी डाॅक्टरांकडूनही प्रयत्न केले जात आहेत.
यासंदर्भात, झारखंड येथे सेवा देत असलेले कुटूंब कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य अभ्यासक डॉ. सचिन बारब्दे म्हणाले की, प्लाझ्मा दान करण्याची पद्धत ही १९२० च्या जवळपास सुरु झाली होती. त्यावेळी युद्धात असलेल्या सैनिकांना प्लाझ्मा दिला जायचा. सैनिकाच्या शरिरात एँटीबॉडीज तयार झाल्याने त्यांचे प्राण वाचायचे. मात्र कोरोना हा व्हायरस असल्यामुळे तो शरिररात मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करतो. त्यामुळे प्लाझ्माचा त्याला इतका फायदा होत नाही, हे शास्त्रज्ञांनाही कळून आले आहे. नागपूर येथे जी प्लाझ्मा ट्रायल झाली होती. त्यातूनही हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे प्लाझ्मा दानापेक्षा रक्तदान करावे, असे मला वाटते. कारण देशात रक्ताची कमतरता आहे. यावर केंद्र सरकारही विचार करेल, अशी अपेक्षा आहे. सरकारने कोविडला हरवण्यासाठी केवळ लसीकरणावर भर द्यायला हवा, असे त्यांनी सांगितले.