संकटं संपता संपेना! कोरोनापेक्षाही खतरनाक सुपरबगने शास्त्रज्ञांच्या चिंतेत भर; माजवू शकतो हाहाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 09:16 AM2021-03-18T09:16:12+5:302021-03-18T09:16:49+5:30
Candida Auris Superbug : कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एक खतरनाक सुपरबग (Superbug) सापडला आहे.
कोरोना व्हायरसचा जगात हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील सर्वच देश कोरोनाचा सामना करत आहे. मात्र आता धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एक खतरनाक सुपरबग (Superbug) सापडला आहे. अंदमान आणि निकोबार बेटावर शास्त्रज्ञांना एक महाभयंकर सुपरबग आढळून आला आहे. हा मल्टी ड्रग्ज रेजिस्टन्स ऑर्गेनिज्म आहे. म्हणजेच त्याच्यावर कोणत्याच औषधांचा काहीच परिणाम होत नाही.
शास्त्रज्ञ डॉ. अर्टुरो कासाडेवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कँडिडा ऑरिस (Candida Auris) असं या सुपरबगचं नाव आहे. दहा वर्षांपूर्वी याचा शोध लागला होता. मात्र हा सुपरबग नेमका कुठून आला हे अद्याप काही समजलेलं नसून ते एक रहस्य असल्याचं म्हटलं जात आहे. कासाडेवाल हे जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या मॉलीक्युलर मायक्रोबायोलॉडी अँड इम्युनोलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. रिसर्च करणाऱ्या संशोधकांच्या टीममध्ये भारतातील काही शास्त्रज्ञांचा देखील समावेश आहे. 2009 साली जपानंमधील एका रुग्णामध्ये हा सुपरबग सापडला होता. त्यानंतर तो जगभर पसरला.
CoronaVirus News : भय इथले संपत नाही! कोरोनाचा नवा स्ट्रेन हा सर्व जुन्या स्ट्रेनपेक्षा अधिक खतरनाकhttps://t.co/vWBLPYZR2G#coronavirus#Corona#CoronaVirusUpdates#CoronaVaccine
— Lokmat (@MiLOKMAT) March 13, 2021
कँडिडा ऑरिसवर उपचार करणं कठीण आहे कारण त्यावर कोणत्याच औषधांचा परिणाम होत नाही. तसेच मानवाच्या शरीरात याचा प्रसार हा वेगाने होत असतो. दिल्ली युनिव्हर्सिटीतील मेडिकल मायकोलॉजिस्ट डॉ. अनुराधा चौधरी आणि त्यांच्या टीमने अंदमान बेटाजवळील बेटे आणि भारत-म्यानमार यांच्यादरम्यानच्या बेटावरील आठ वेगवेगळ्या ठिकाणावरील माती आणि पाण्याची तपासणी केली. यामध्ये सुबरबगचे सँपल हे मल्टीड्रग रेसिसटेंट असल्याचं समोर आलं आहे, सेटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या मते, कँडिडा ऑरिसमुळे रक्तासंबंधी गंभीर संसर्ग होऊ शकतो. यावर उपचार करणं कठीण आहे.
एप्रिल 2019 मध्ये CDC ने या मायक्रोबच्या हल्ल्याची एक लिस्ट तयार केली होती. ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, कॅनडा, चीन, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी, भारत, इराण, इस्रायल, जपान, केनिया, कुवैत, मलेशिया, मेक्सिको, नीदरलँड्स, नॉर्वे, ओमान, पाकिस्तान, पनामा, रशिया, सौदी अरब, सिंगापूर, साऊथ अफ्रीका, साऊथ कोरिया, स्पेन स्विर्झलँड, तैवान, यूएई, युके, अमेरिका या देशांतील लोकांना याचा संसर्ग झाला होता. यावर लस तयार करून त्याचा उंदरावर प्रयोग करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला. पण अद्याप या लसीची मानवी चाचणी झालेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : धोका वाढला! देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल एक कोटीवरhttps://t.co/y7ZcpWaKWv#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) March 16, 2021