शास्त्रज्ञ शाळा, महाविद्यालयात शिकविणार
By admin | Published: September 9, 2014 04:14 AM2014-09-09T04:14:18+5:302014-09-09T04:14:18+5:30
देशातील पाच हजार सवरेत्तम शास्त्रज्ञ विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत. हे शास्त्रज्ञ विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणार्या विविध विभागांत कार्यरत आहेत.
नवी दिल्ली : देशातील पाच हजार सवरेत्तम शास्त्रज्ञ विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत. हे शास्त्रज्ञ विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणार्या विविध विभागांत कार्यरत आहेत.
या निर्णयाची घोषणा विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्रसिंग यांनी केली. आमच्या विभागातील सर्व शास्त्रज्ञांना शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकवावे लागेल, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काही शिकविण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असे म्हटले होते. त्यातून प्रेरणा घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
आमच्या प्रत्येक विभागाच्या शास्त्रज्ञांना शाळा, महाविद्यालयात शिकविणे अनिवार्य करण्यात येत आहे. याबद्दल मला आनंद होत आहे. ही बाब भारतासारख्या देशात नवीन कल्पना आहे, असे ते म्हणाले.अशाप्रकारचे कार्य शास्त्रज्ञांसाठी त्यांच्या ड्युटीचा भाग असेल. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात १00 दिवसांच्या कामगिरीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, यास संस्थागत रूप देऊन आम्ही त्याचा मार्ग काढला आहे आणि या विभागाच्या प्रत्येक शास्त्रज्ञांसाठी ते अनिवार्य करण्यात आले. ते किमान १२ तासांच्या व्याख्यानासाठी वेळ काढतील.