Jay Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं असं काय म्हणाले, ज्यानंतर BCCI सचिव जय शाह ट्रेडिंगमध्ये?, मीम्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 03:22 PM2022-08-15T15:22:06+5:302022-08-15T15:36:06+5:30

Independence Day 2022 :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवव्यांदा ध्वजारोहण करण्यात आले आहे.

 'Scindia, Jay Shah...': Netizens and Opposition takes on PM Narendra Modi after he attacks 'parivarvad' in I-Day speech | Jay Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं असं काय म्हणाले, ज्यानंतर BCCI सचिव जय शाह ट्रेडिंगमध्ये?, मीम्स व्हायरल

Jay Shah : पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं असं काय म्हणाले, ज्यानंतर BCCI सचिव जय शाह ट्रेडिंगमध्ये?, मीम्स व्हायरल

googlenewsNext

Independence Day 2022 :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर आज सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवव्यांदा ध्वजारोहण करण्यात आले आहे.  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मी जगभरातील भारतप्रेमींना, भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो, असं नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम सांगितलं. तसेच केवळ भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात हा तिरंगा अभिमानाने फडकत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हणाले.  नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र  व BCCI सचिव जय शाह ( Jay Shah) यांच्या नावाने नेटिझन्सनी ट्रेंड सुरू केला अन् सुसाट मीम्स व्हायरल केले. 

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात भ्रष्टाचार व घराणेशाही ही दोन मोठी आव्हानं देशासमोर असल्याचे म्हटले.  ते म्हणाले की, आमच्या अनेक संस्था कौटुंबिक राजवटीमुळे प्रभावित होतात, यामुळे आमच्या प्रतिभेला, देशाच्या क्षमतेला हानी पोहोचते आणि भ्रष्टाचाराला चालना मिळते. जेव्हा मी घराणेशाहीबद्दल बोलतो तेव्हा लोकांना वाटते की मी फक्त राजकारणाबद्दल बोलत आहे. नाही, दुर्दैवाने राजकीय क्षेत्रातील दुष्कृत्याने भारतातील प्रत्येक संस्थेत परिवारवाद वाढवला आहे. 


मोदींच्या या विधानानंतर काँग्रेस नेत्या अलका लाम्बा यांनी टीका केलीच शिवाय नेटिझन्सनीही जय शाह यांना टार्गेट करून मीम्स व्हायरल केले. 




Web Title:  'Scindia, Jay Shah...': Netizens and Opposition takes on PM Narendra Modi after he attacks 'parivarvad' in I-Day speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.