निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 08:02 PM2024-11-08T20:02:59+5:302024-11-08T20:04:14+5:30

सीआरपीएफच्या ग्राऊंड कमांडर म्हणजेच सहाय्यक कमांडट ते कमांडंटपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्ता बंद करण्यात आला आहे.

Scissors on Ration Money Allowance of CRPF officers; 4000 loss per month | निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

देशाचे निमलष्करी दल (CRPF) च्या अधिकाऱ्यांचा रेशन भत्त्यावर कात्री चालविण्यात आली आहे.  यामुळे या अधिकाऱ्यांना दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान होणार आहे. यामुळे अधिकाऱ्यांत नाराजी असून त्यांनी सरकारचे हे पाऊल मनोबल खच्ची करणारे असल्याचे म्हटले आहे. 

सीआरपीएफच्या ग्राऊंड कमांडर म्हणजेच सहाय्यक कमांडट ते कमांडंटपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्ता बंद करण्यात आला आहे. सीआरपीएफमध्ये ड्युटी बटालियन सोडून इतर अधिकाऱ्यांचा हा भत्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे या अधिकाऱ्यांचे सरासरी ४००० रुपयांचे नुकसान होणार आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलिसांच्या ३ डिव्हिजनमध्ये देखील अशाच प्रकारचे आदेश काही दिवसांपूर्वी जारी केले आहेत. यानंतर सीआरपीएफ महासंचालकांनी शुक्रवारी हे आदेश जारी केले आहेत. या अधिकाऱ्यांना १ नोव्हेंबरपासून हा भत्ता दिला जाणार नाही. 

चार वर्षांपूर्वी सीआरपीएफच्या ९ रँकवर तैनात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिटॅचमेंट अलाऊन्स देण्याचा निर्णय घेण्यात आला आहो. यावेळी हे कर्मचारी जर रेशन मनीसाठी पात्र असतील तर त्यांना हा भत्ता देखील दिला जाणार असल्याचे आदेश काढले होते. CRPF मध्ये आता फक्त ड्युटी बटालियनमध्येच रेशन मनी भत्ता मिळणार आहे. ड्युटी बटालियनमधून इतरत्र नियुक्ती झाल्यास अधिकाऱ्यांना रेशनचे पैसे मिळणार नाहीत. सध्याच्या व्यवस्थेत दलाच्या कोणत्याही संस्थेत आणि कुठेही नियुक्ती केल्यास रेशन भत्ता दिला जात होता.

Web Title: Scissors on Ration Money Allowance of CRPF officers; 4000 loss per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.